
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयात राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्रसंगी प्राचार्य दवंगे व उपस्थित सेवक
सुकेणे (प्रतिनिधी )- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यात आले अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते सुरुवातीला प्राचार्य दवंगे,उपमुख्याध्यापक अनिल परदेशी,पर्यवेक्षक राजेश खताळ व उपस्थितांच्या हस्ते शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी विद्यार्थिनी कु सिद्धी वडघुले व संगीत शिक्षक रामेश्वर धोंगडे यांनी शाहू महाराज यांच्या कार्याची ओळख करून दिली अध्यक्ष प्राचार्य दवंगे यांनी शाहू महाराज यांचे सामाजिक व राजकीय कार्य विशद करत सर्वसामान्यांसाठी दिलेले योगदान याविषयी उपस्थित शिक्षक व विद्यार्थी यांना ओळख करून दिली सूत्रसंचालन रामेश्वर धोंगडे यांनी तर आभार क्रीडा शिक्षक दिलीप काळे यांनी मानले कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते
