
आसरखेडे ( वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संचलित जनता विद्यालय आसरखेडे येथे सामाजिक न्यायाचे प्रणेते, समाजसुधारक राजर्षी शाहू महाराज यांना जयंती निमित्त अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीम.कापडणीस मॅडम होत्या. याप्रसंगी प्रथमतः मा.मुख्याध्यापकांच्या हस्ते प्रतिमापूजन संपन्न झाले.त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून राजर्षि शाहू महाराजांच्या जीवन कार्याचा परिचय करून दिला. त्यानंतर शिक्षक मनोगतातून श्री. बोरगुडे सर यांनी शाहू महाराजांच्या कार्याची माहिती दिली. तसेच अमली पदार्थ दिनाचे महत्व व जागरूकता याबाबत मुख्याध्यापिका श्रीम कापडणीस मॅडम यांनी सविस्तर माहिती सांगितली.प्रसंगी अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त चित्रकला,घोषवाक्य, निबंध,वक्तृत्व या स्पर्धांचे देखील आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार कुमारी . दीप्ती हिने केले . कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले .
