
नांदगाव (प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका(मं) आयोजित विकसित भारत अमृत काळ मोदी सरकार ची11 वर्ष पुर्तीसंकल्प से सिद्धी तक कार्यक्रम नांदगाव पंचायत समिती सभागृह येथे संपन्नकार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा सुनील सौदाणे साहेब (तहसीलदार नांदगाव)प्रमुख पाहुणे श्री पाठक साहेब ( गटविकास अधिकारी) हे होतेआज दि. 26 जून रोजी नांदगाव पंचायत समिती येथे भारतीय जनता पार्टी नांदगाव तालुका आयोजित मोदी सरकार11 वर्ष पुर्ती संकल्प से सिद्धी तक हा कार्यक्रम संपन्न झाला…..शासनाकडून नवीन नवीन योजना कोणकोणत्या आहेत याची माहिती उपस्थित विभाग प्रमुखांनी उपस्तीत भाजपा पदाधिकारी व नागरिकांना सांगितली पशुसंवर्धन,आरोग्य,शिक्षण,महसूल,कृषी,अन्न पुरवठा घरकुल,विविध अनुदान आर्थिक मदती या विषयी मा तहसीलदार साहेब यांनी सखोल माहिती दिली यावेळी मोदी सरकार चे यशस्वी 11 वर्ष याबद्दल विस्तृत अशी योजनांची माहिती दत्तराजजी छाजेड यांनी दिली, यावेळी सतिषभाऊ शिंदे ,रेखाताई शेलार, प्रदीप भाऊ थोरात, अभिषेक विघे,कपिलभाऊ तेलुरे (जिल्हाध्यक्ष राष्ट्रीय रिपब्लिकन) चौधरी ताई यांनी मनोगत मांडली सरकारच्या असणाऱ्या योजना लोकांपर्यंत पोहचवून लाभ मिळवून देण्याचे कार्य पक्ष्याने दिले आहे ते जोमाने करावे सर्व प्रशासनाने कार्यकर्त्यांना सहकार्य करावे तसेच आजच्या दिवशी संकल्प करू की *एक पेड मा के नाम* वृक्षारोपण करून त्याचे पोषण करावे अशी अपेक्षा तालुका अध्यक्ष संजय सानप यांनी या प्रसंगी केली संजय आसन यांनी तालुक्यात किती कार्य करण्यात आले याचा आढावा सांगितलंभा ज पा चे बाबाजी शिरसाठ,. मानिषाताई पाटील वकील ,उमेश उगले, उमेश सरोदे वकील, शेकर पाटील वकील, बबन मोरेमुळडोंगरी,शांताराम जाधव न्यायडोंगरी, सतिष अहिरे,बळवंत शिंदे धनराज मंडलिक,रवी लोखंडे, गणेश शर्मा, सौं अन्नपूर्णाबाई जोशी,मनोजभाऊ शर्मा,डॉ आहेर,इ पदाधिकारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संकलन सौ तारताई शर्मा यांनी केले तर आभार प्रदर्शन राजेंद्र गांगुर्डे यांनी केले.
