
मखमलाबाद विद्यालयाला ऑलिम्पियाड परीक्षेत मिळालेली एक्सलंट परफॉर्मन्स आऊटस्टँडिंग ट्रॉफी प्राचार्य संजय डेर्ले यांच्याकडे सुपूर्त करताना विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील पाटील.याप्रसंगी सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.
मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद या शाळेने सी.पी.एस.ऑलिम्पियाड या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केल्यामुळे विद्यालयास बेस्ट आऊटस्टँडिंग स्कूल ट्रॉफी मिळालेली आहे.या स्पर्धा परीक्षेत इयत्ता पाचवी ते दहावीच्या एकूण २६० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता.अतिशय काठीण्य पातळी असणारी ही परीक्षा होती.यामध्ये ६० विद्यार्थ्यांना गोल्ड,सिल्वर,ब्रांझ मेडल मिळालेले आहे.शाळेला मिळालेली एक्सलंट परफॉर्मन्स आऊटस्टँडिंग ट्रॉफी प्राचार्य संजय डेर्ले यांच्याकडे सुपूर्त करताना विद्यालयाचे पर्यवेक्षक सुनील पाटील.याप्रसंगी व्यासपीठावर ज्येष्ठ शिक्षिका सविता आहेर,बेबी जाधव, भाग्यशाली जाधव,अनिता जाधव व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षिका योगिता कासार व योगिता रोडे यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.या मार्गदर्शक शिक्षकांचे प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला.

यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,संचालक रमेश आबा पिंगळे,माजी सेवक संचालक डॉ. अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,शालेय समिती सदस्य,मविप्र सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले.
