
मखमलाबाद विद्यालयात रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पूजन करतांना प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील,ज्युनिअर कॉलेज प्रमुख प्रा.विकास थोरात,प्राध्यापक,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी
मखमलाबाद { वार्ताहर } = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे रयतेचा राजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.प्राचार्य संजय डेर्ले व ज्येष्ठ शिक्षिका स्वाती होळकर यांच्या शुभहस्ते प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी व्यासपीठावर सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते.कु.अश्विनी चव्हाण हिने राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली.बहुजनांचा आधार, कर्तव्यदक्ष,आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कर्तृत्व व नेतृत्व विशाल होते.ते राजघराण्यात राहूनही लोकांसाठी जगले आणि रयतेचा राजा लोकराजा ठरले.त्यांनी बहुजन मागासलेल्या आणि तळागाळातील वर्गाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले.त्यांनी जातीप्रथेला विरोध केला.कोल्हापुरात मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा कायदा केला.विधवा पुनर्विवाह स्री शिक्षणाला प्रोत्साहन दिले.मविप्र शिक्षण संस्थेला त्यांचा राजाश्रय लाभला होता.त्यांचे कार्य आणि विचार आजही आपल्याला प्रेरणा देतात.सूत्रसंचालन ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी वडघुले व कु.तेजस्विनी वाघेरे यांनी केले.इ.१० वी अ च्या विद्यार्थिनींना वर्गशिक्षक बाळासाहेब पवार यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
