
मखमलाबाद विद्यालयात आद्य शंकराचार्य न्यासातर्फे “संस्कृत” विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याप्रसंगी शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त अवधूत देशपांडे, मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे, प्राचार्य संजय डेर्ले,पालक,सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी.
( एकूण १,२८,५००/- रु.ची बक्षिसे प्रदान)

मखमलाबाद ( वार्ताहर ) = मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमलाबाद येथे महाकवी कालिदास दिनानिमित्त आद्य शंकराचार्य न्यासातर्फे आद्य शंकराचार्य यांच्या स्मरणार्थ “संस्कृत” विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त अवधूत देशपांडे, मराठा हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे उपस्थित होते.याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य संजय डेर्ले,ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार, प्रमोद पगार,स्वाती होळकर, योगिता कापडणीस,अश्विनी वडघुले आदी उपस्थित होते.सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत महाकवी कालिदास यांच्या प्रतिमेचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. प्राचार्य संजय डेर्ले यांच्या शुभहस्ते प्रमुख पाहुण्यांचा शाल व गुलाबपुष्प देऊन सत्कार करण्यात आला. प्राचार्य संजय डेर्ले यांनी प्रास्ताविक केले. प्रास्ताविकात त्यांनी कार्यक्रमाची रुपरेषा सांगून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.कु.सार्थक परभणे याने प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.कु.प्रांजल शिंदे हिने संस्कृत मधून गीतगायन केले.कु.अमृता गीते हिने महाकवी कालिदास यांच्या जीवनकार्याविषयी व साहित्याविषयी सखोल माहिती दिली.शंकराचार्य न्यासाचे विश्वस्त अवधूत देशपांडे यांनी आपल्या मनोगतात महाकवी कालिदास यांना अभिवादन करून कार्यक्रमाचा हेतू स्पष्ट केला. विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाची गोडी निर्माण व्हावी.संस्कृत भाषेचा प्रचार व प्रसार व्हावा या उदात्त हेतूने संस्कृत विषयातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात येतो असेही त्यांनी शेवटी सांगितले.माजी मुख्याध्यापक अरुण पिंगळे यांनी आपल्या मनोगतात संस्कृत भाषेचं महत्त्व पटवून दिले.त्यांनी आपल्याला शिकविणाऱ्या संस्कृत शिक्षकांची नावे सांगून जुन्या गोष्टींना उजाळा दिला.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे त्यांनी कौतुक करून अभिनंदन केले.इयत्ता ८ वी ते १० वीच्या संस्कृत विषयातील प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक प्राप्त २०७ विद्यार्थांना मान्यवरांच्या शुभहस्ते चेक देऊन एकूण १,२८,५००/- रुपयांची बक्षिसे खालीलप्रमाणे प्रदान करण्यात आली.

४० विद्यार्थांना प्रत्येकी १०००/ रुपये
६० विद्यार्थांना प्रत्येकी ७५०/रुपये
५७ विद्यार्थांना प्रत्येकी ५००/रुपये
५० विद्यार्थांना प्रत्येकी ३००/रूपये
याप्रमाणे एकूण १,२८,५००/- रुपयांची बक्षिसे प्रदान करण्यात आली.
या सर्व यशस्वी विद्यार्थांना ज्येष्ठ संस्कृत शिक्षिका योगिता कापडणीस,अश्विनी वडघुले यांचे बहुमोल असे मार्गदर्शन लाभले.यशस्वी विद्यार्थ्यांचे मविप्र सरचिटणीस ॲड.नितीन ठाकरे,मविप्र अध्यक्ष डॉ.सुनील ढिकले,संचालक रमेश आबा पिंगळे, संचालक ॲड.लक्ष्मणराव लांडगे माजी सेवक संचालक डॉ.अशोकराव पिंगळे,शिक्षणाधिकारी डॉ.भास्करराव ढोके,उच्च माध्यमिक समिती अध्यक्ष पंडितराव पिंगळे,अभिनव शालेय समिती अध्यक्ष निवृत्ती महाले,कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समितीचे अध्यक्ष सुरेश पिंगळे,होरायझन स्कूल कमिटी अध्यक्ष शंकरराव पिंगळे,शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष वाळू काकड,शालेय समिती सदस्य,मविप्र सभासद,ग्रामस्थ,प्राचार्य संजय डेर्ले,पर्यवेक्षक सुनील पाटील सर्व शिक्षक वृंद शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष अभिनंदन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. देवयानी भोये,कु.स्वराली परदेशी व ज्येष्ठ शिक्षक अनिल पगार यांनी केले.आभार प्रदर्शन ज्येष्ठ शिक्षिका अश्विनी वडघुले यांनी केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक,शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
