
सोनांबे (प्रतिनिधी )शाळेतील वर्गांमधून देशाचे भावी नागरिक घडत असतात.उन्हाळ्याच्या सुट्ट्यांचा सदुपयोग व्हावा व प्रत्येक विद्यार्थ्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी बालसंस्कार वर्ग उपयुक्त ठरतील असे प्रतिपादन मुख्याध्यापक प्रभाकर फटांगळे यांनी केले. ते सोनांबे जनता विद्यालयात आयोजित केलेल्या बालसंस्कार वर्गाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. विद्यालयाचे पर्यवेक्षक दिगंबर जाधव,ज्येष्ठ शिक्षक पंडित चिने,दीपक पगारे,ज्योती पाटील,भारती धाकतोडे,किरण पवार,नवनाथ माळी मंचावर उपस्थित होते. तालुका संचालक आदरणीय कृष्णाजी भगत साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली 2 जून पासून 14 जून पर्यंत चालणाऱ्या या वर्गात सूर्यनमस्कार,इंग्रजी संभाषण,श्लोक पाठांतर,अक्षर वळणदार बनवूया,कथाकथन,वाचू आनंदे,मैत्री गणिताशी,अभ्यास कसा करावा? तंत्र व मंत्र, कवायत, मराठी वाचन,ओळख प्रयोगशाळेची आदी विषयांचे मार्गदर्शन होणार असल्याचेही त्यांनी सांगितलेसांस्कृतिक प्रमुख दीपक भालेराव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.पर्यवेक्षक दिगंबर जाधव यांनी आभार मानले.उपक्रमशील शिक्षिका योगिता शिंदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.रुपावली काळे,मिलिंद पाटील,वर्षा सोनवणे,सुहास जुन्नरे,भाऊसाहेब दहिफळे,रोहिणी पवार,संवेदिता जाधव,जालंदर कांडेकर,स्मिता पवार,निवृत्ती साबळे,भाऊसाहेब तांबे,राजेंद्र पालवे,राम शेळके,पालक शाम काळुंगे आदी यावेळी उपस्थित होते.सहभागी विद्यार्थ्यांना विद्यालयाकडून वही,पेन व खाऊ वाटप करण्यात आला.विद्यालयात परिसरातील प्रविष्ट झालेले विद्यार्थी मोठ्या संख्येने वर्गाला उपस्थित होते.
