
सोलापूर ( सुधीर खरटमल*दि. १:-“29 जून 205 रविवारी सोलापुरात होणाऱ्या अंतर्गत आरक्षण, नवीन शैक्षणिक धोरण २०२० या मुळे ढोर समाजाच्या नवीन पिढी वर येऊ घातलेल्या आपत्ती वर विचारमंथन करणेसाठी बोलावलेल्या मेळाव्यासाठी आम्ही सज्ज आहोत!”* असा विश्वास समाजाचे ज्येष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी या बैठकीच्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून व्यक्त केला. या वेळी अध्यक्षस्थानी लक्ष्मीदास सोनकवडे हे होते तर प्रमुख पाहुणे लक्ष्मण होटकर सह अॅड केशव इंगळे, बाबुराव इंगळे, सिध्देश्वर शिंदे, महादेव होटकर, सुरेंद्र कटकधोंड, नामानंद कटकधोंड, शारदा शिंदे, मुकुंद शिंदे, अशोक सदाफुले, तिप्पण्णा इंगळे, आनंद व्हटकर, अशोक शिंदे, ब्रह्मानंद धडके, नंदकुमार सोनकवडे, राजेश कटकधोंड, किरण सदाफुले, अतुल शेरखाने यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी प्रस्तावना सच्चिदानंद व्हटकर यांनी केले तर मुन्नाजी कटके यांनी सुत्रसंचालन केले. या वेळी केशव इंगळे यांनी “शासनाच्या अंतर्गत वर्गिकरण या अन्यायकारक सरकारी नीतीमुळे ढोर समाजाच्या आरक्षणाला ग्रहण लागले आहे. या साठी शासनाविरुधद सनदशीर मार्गाने आवाज उठवला पाहिजे.” अध्यक्ष स्थानावरून बोलतांना लक्ष्मीदास सोनकवडे म्हणाले की, “ढोर समाजाच्या भावी पिढी शैक्षणिक, नोकरी विषयक, आर्थिक प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी संघटीत आवाज उठवला पाहिजे.”शेवटी आभार गंगाधर सोनवणे नी मानले.
