
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित ३२८० वा दिवस
आजचा वाढदिवस
माजी नगराध्यक्ष भास्करराव नामदेव कदम, नांदगाव


उत्तमराव त्र्यंबक लासूरे, डोंबिवली
आपण कोणताही अनुभव केवळ एक मानसिक प्रक्रिया या स्वरूपातच जाणू शकतो. मनात घडणारी एक घटना आणि तद्वतच मेंदूवरील एक ठसा या स्वरूपातच तो आपण जाणू शकतो. आपण आपला मेंदू मागे किंवा पुढे रेटू शकत नाही, परंतु आपले मन मात्र आपण मागे-पुढे नेऊ शकतो. मन हे भूत, वर्तमान, भविष्य या सर्वच काळांमध्ये पसरविता, फैलाविता वा विस्तारिता येणे शक्य आहे; आणि म्हणून मनामध्ये जे घडते ते कायमचे ठसले जाते. चिरकाल संचितावस्थेत राहते. मनामध्ये सर्व घटना पूर्वीपासूनच वर्गीकृत संस्काराच्या स्वरूपात आहेत; मन सर्वव्यापी आहे. देश, काल कार्यकारणसंबंध ही विषय आकळण्याची वा विचार करण्याची आपल्या मनाची एक रीत वा पध्दत आहे.
स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर जेष्ठ /शुक्रमास ३ शके १९४८
★ जेष्ठ अधिक शुध्द /शुक्ल ९
★ शालिवाहन शके १९४८
★ शिवशक ३५१
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ विक्रम (रौद्र) संवत्सर २०८३
★ रविवार दि. २४ मे २०२६
★ १५४३ सुर्यकेंद्री विश्वाच्या संकल्पनेचा सिध्दांत मांडणारे पोलिश खगोलशास्त्रज्ञ आणि निकोलस कोपर्निकस यांचा स्मृतीदिन.
★ १९४२ जेष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचा जन्मदिन.
★ राष्ट्रकुल दिन.
