
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२५ वा दिवस जगात काय चुकीचे आहे हे दाखवून देऊन आणि त्याचा केवळ निषेध करून नवनिर्मिती होत नसते. देशाचे पुनरुत्थान, पुनर्बांधणी, पुनर्निर्माण करण्यासाठी आपापसातील मतभेद विसरून सर्वांनी केंद्रित आणि संघटीत होऊन आपले बळ एकवटले पाहिजे. मोठ्या गोष्टी या केवळ त्यागानेच होतात. शेवटी देशाच्या उभारणीच्या साऱ्या चर्चा एकाच गोष्टी जवळ येऊन थांबतात. “मी देशास काय देण्यास तयार आहे? मी माझ्या देशासाठी, समाजासाठी किती वेळ, किती पैसा आणि किती शक्ती देऊ शकतो.” *स्वामी विवेकानंद…* *●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १३ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ८
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ मंगळवार दि. ३ जून २०२५
★ १८१८ मराठेशाहीचा अस्त. शेवटचे पेशवे दुसरे बाजीराव हे मध्यप्रदेशातील असीरगढजवळ ढोलकोट येथे जनरल माल्कम याच्या स्वाधीन झाले. शनिवार वाड्यावर ब्रिटिशांचा युनियन जॅक फडकला.
★ १९१६ महर्षी धोंडो केशव कर्वें यांनी भारतातील पहिल्या महिला विद्यापीठाची स्थापना केली
.★ १९४७ हिंदुस्तानच्या फाळणीची मांउंटबॅटन योजना जाहीर झाली.
★ १९८४ पंजाबमधिल अमृतसर येथील सुवर्णमंदिरातून खलिस्थानवादी दहशतवाद्यांना बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय सेनेने “ऑपरेशन ब्लू स्टार” लष्करी कारवाई केली.
★ २०१४ महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांचा स्मृतीदिन
★ जागतिक सायकल दिन.
