
जळगाव निंबायती (वार्ताहर) – येथिल अहिल्यादेवी शिक्षण संस्थेच्या गो. य. पाटील विद्यालयात अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीदिनी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी संस्थेचे समन्वयक निंबाजी शिंदे होते. समवेत सचिव महेंद्र पाटील, प्राचार्य पी. एन. पवार, पर्यवेक्षक व्ही. डी. काळे, सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारींसह बहुसंख्येने विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन डी. जे. देवरे यांनी केले. तर आभार डी. के. जगताप यांनी मानलेत.
