
.सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२४ वा दिवस भारताला कधीतरी सुधारकांची उणीव पडली आहे काय? आपण भारताचा इतिहास पाहिला आहे काय? रामानुजाचार्य कोण होते? शंकराचार्य कोण होते? गुरू नानक कोण होते? चैतन्य महाप्रभू कोण होते? कबीर व दादू हे कोण होते? भारताच्या आकाशात अत्युज्ज्वल ताऱ्यांप्रमाणे एकामागून एक चमकून गेलेले हे सर्व महान उपदेशक कोण होते? रामानुजाचार्यांना दलितवर्गाबद्दल कळवळा वाटत नव्हता काय? त्यांनी आयुष्यभर चांडाळांना सुद्धा आपल्या पंथात घेण्याचा प्रयत्न केला नाही काय? मुसलमानांना देखील आपल्या पंथात सामावून घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला नाही काय? गुरू नानकांनी हिंदू व मुसलमान दोघांशीही विचारविनिमय करून एक नवी घडी बसविण्याचा प्रयत्न केला नाही काय ? त्या सर्वांनी प्रयत्न केले आणि त्यांचे कार्य अजून सुरू आहे.
स्वामी विवेकानंद…
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १२ जेष्ठ शके १९४७
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २ जून २०२५
★ १९४८ शेतकरी कामगार पक्षाची स्थापना.
★ १९५५ इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांचा जन्मदिन.
★ १९८८ सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते, निर्माता, दिग्दर्शक राज कपूर यांचा स्मृतीदिन.
★ २००४ महाराष्ट्राचे अवलिया व्यक्तीमत्व श्रीकांत जिचकार यांचा स्मृतीदिन.
संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक
