
सेलू (प्रतिनिधी ) येथील सेलू तालुका पेन्शनर्स असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा दि.२६ मे २०२५ रोजी असोसिएशनचे अध्यक्ष डाॅ.विनायकराव कोठेकर यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली.या सभेत प्रा.प्रभाकर रावते यांनी नवीन कार्यकारिणीचा प्रस्ताव मांडला .प्रस्तावास श्री.प्रकाशराव काकडे,प्रा.हेमलता जोशी व सौ.सुनंदा खेडकर यांनी अनुमोदन दिल्यानंतर आमसभेत पुढील पांच वर्षासाठी कार्यकारिणी व विविध उपक्रम समित्यांची सर्वानुमते घोषित करण्यात आली.डाॅ.प्राचार्य श्री.शरद कुलकर्णी (अध्यक्ष)विलास चंदरराव पाटील (उपाध्यक्ष) नारायणराव इक्कर (सचिव ) गौतम सूर्यवंशी व आनंद देशमुख (सहसचिव)अनिल बंडेवार (कोषाध्यक्ष) तर कार्यकारीणी सदस्य म्हणून सर्वश्रीनागेश देशपांडे,गंगाधर हिवरे ,रघुनाथ देशमुख, रवींद्र मुळावेकर, प्रा.सुभाष बिरादार, प्रकाश धामणगावकर, विनायक कुलकर्णी, मधुकर वाकडीकर, प्रभाकर गोरे,लक्ष्मण केदासे,सदाशिव जाधव,शेख उस्मान शे.नन्हू तर महिला सदस्य म्हणून सौ.हेमलता चंद्रकांत कुलकर्णी. सौ.रोहिणी अनिल कुलकर्णी,सौ.सुनंदा बालासाहेब खेडकर यांची निवड करण्यात आली.सल्लागार समितीवर ज्येष्ठ सभासदातून सर्वश्री.प्राचार्य श्री.द. रा कुलकर्णी, प्राचार्य डाॅ.विनायकराव कोठेकर, बापुराव काळे ,विश्वनाथ धर्माधिकारी, डाॅ.गंगाधर गळगे यांची मार्गदर्शक म्हणून निवड करण्यात आली.याशिवाय वर्षभरात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे संयोजक म्हणून सर्वश्री.सर्वश्री.सतीश टाक ( बांधकाम),रवि कुलकर्णी ( नाट्य विभाग)टी.के.कुलकर्णी (योग वर्ग) यशवंत चारठाणकर ( अभंग वाणी ) मोहन परदेशी व श्याम आढे ( संगीत विभाग ) शामसुंदर बोराडे (पंचायत समिती)चंद्रहास पटेल (आंतरराज्य सहल ) लक्ष्मीकांत कुलकर्णी ,( परिसर सहल )प्रा.के.डी.वाघमारे ,दिन विशेष)पद्माकर जोशी ( मास मिडिया )विलास घुगे ( आरोग्य विभाग) या नवीन कार्यकारिणी पदाधिकारी व सभासदांचे डाॅ.विनायकराव कोठेकर यांनी स्वागतासह अभिनंदन केले .तर नवनिर्वाचित अध्यक्ष डाॅ.शरद कुलकर्णी यांनी आपलेमनोगत व्यक्त करतांना पेन्शनर्स असोसिएशनच्या लौकिकाचा वारसा समर्थपणे पुढे नेण्याचा निर्धार बोलून दाखवला.
