
नाशिक (प्रतिनिधी). नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात साधू महंतांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या अध्यक्षतेखाली व शालेय शिक्षण मंत्री ना. श्री. दादाजी भुसे साहेब यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली.

यावेळी साधू महंतांनी विविध सूचना केल्यात यात गोदावरी स्वच्छता, परिसराचा विकास, जमीन अधिग्रहण करणे, अतिक्रमण हटवणे यांसह अनेक विषयांवर यावेळी चर्चा झाली.साधू महंतांच्या सूचना ह्या महत्त्वाच्या असून लवकरच या सर्व सूचनांचे पालन करून त्यादृष्टीने काम करण्यात येईल. गोदावरी स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही सर्वांची असून या कामाला लवकर सुरवात होणार आहे. गोदा मातेचे पावित्र्य राखण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे.

गोदावरी फक्त कुंभमेळा दरम्यान स्वच्छ न राहता कायम स्वरुपी स्वच्छ राखण्यासाठी प्रयत्नशील आहोत.येणाऱ्या काळात होणारा कुंभ हा सर्व साधू महंतांच्या आशीर्वादाने होणार असून कुठलीही असुविधा होणार नाही यासाठी उपाययोजना केल्या जातील. जमीन आरक्षित केलेली असून अधिग्रहित देखील लवकर केली जाईल.बैठकी प्रसंगी मंत्री मा. श्री. नरहरी झिरवळ, मा. श्री. गिरीश महाजन, आ. सौ. सीमा हिरे, आ. श्री. राहुल आहेर, आ. श्री. राहुल ढिकले, संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.*🔸 मुख्यमंत्री महोदयांनी भाविकांसाठी सिंहस्थपर्व कालातील तीर्थस्थान व दर्शन, यात्रा इ. साठी विशेष मुहूर्त…!*1. आषाढ – कृ.5 – शनिवार – 31/10/2026 – ध्वजारोहण2. आषाढ – कृ.30 – सोमवार – 02/08/2027 – प्रथम अमृतस्नान, सोमवती अमावस्या,3. श्रावण – अमावस्या – मंगळवार – 31/08/2027 – व्दितीय अमृतस्नान, अमावस्या4. भाद्रपद – शु. 11 – शनिवार – 11/09/2027 – तृतीय अमृतस्नान, एकादशी*पुरोहित संघ त्र्यंबकेश्वर**🔸 भाविकांसाठी सिंहस्थपर्व कालातील तीर्थस्थान व दर्शन, यात्रा इ. साठी विशेष मुहूर्त*1. आश्विन – कृ.७ – शनिवार – 31/10/2025 – ध्वजापर्व गुरुसिंह राशिप्रवेश, सिंहस्थप्रारंभ2. आषाढ – कृ. 30 – सोमवार – 02/08/2027 – दर्श अमावास्या, प्रथम अमृतस्नान, सूर्यग्रहण 3. श्रावण – कृ. 30 – मंगळवार – 31/08/2027 – व्दितीय अमृतस्नान, मुख्यपर्व 4. भाद्रपद – शु.१ – रविवार – 12/09/2027 – तृतीय अमृतस्नान
