
..नाशिक: दि.३१ (वार्ताहर) मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सातपूरचे पर्यवेक्षक नंदकुमार न्याहारकर यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. त्यानिमित्त नैताळे येथील माजी विद्यार्थ्यांनी नाशिक येथे त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन सेवापुर्ती निमित्त सत्कार करून शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी शिक्षक संजय कदम अण्णा अडसरे राजू जाधव दौलत जाधव बाजीराव जेऊघाले आदी उपस्थित होते.
