
.नांदगाव-(प्रतिनिधी )शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिलांच्या पगारवाढ विमा संरक्षण किमानवेतन वाढ यासह इतर अनेक रास्त मागण्यांसाठी आधारवड महिला बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या घरावर महिला पुरुष यांचा भव्य विराट मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा सौ संगिता सोनवणे यांनी दिली आधारवड संस्थेची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला या मोर्चाला इतर अनेक संघटनानी पाठिंबा जाहीर केला असुन तेही या मोर्चात सहभागी होणार असल्याची माहिती सोनवणे यांनी दिली. शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या महिला पुरुष यांना अनेक अडीअडचणीचा सामना करावा लागतो शाळेत शिक्षकांपासून ते गावखेड्यात असलेले शालेय समिती सदस्य यांचाही त्रास सहन करावा लागतो यासह त्यांना अगदी तुटपुंज्या मानधनात काम करावे लागते या महिलांना कोणत्याही प्रकारचे विमा संरक्षण नाही यामुळे कधी अपघात झाला तर त्यांचा जीव धोक्यात येतो नुकताच त्रंबकेश्वर येथे कुकर फुटून पोषण आहार शिजवणाऱ्या महिलेला आपला डोळा गमवावा लागला आशा अनेक घटना घडत असतात मात्र त्यांना विमा संरक्षण नसल्याने त्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो किमान वेतनवाढ विमा संरक्षण कायमस्वरूपी नोकरी यासह इतर अनेक प्रलंबित प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आम्ही शालेय पोषण आहार शिजवणाऱ्या कामगारांना घेऊन शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या घरावर मोर्चा काढत असुन हा मोर्चा येत्या ८ जून रोजी सकाळी काढण्यात येणार आहे दादा भुसे यांच्या मालेगाव येथील निवासस्थानी हा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती आधारवड महिला सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा सौ संगिता सोनवणे यांनी दिली आज नांदगाव येथे झालेल्या महत्वपूर्ण बैठकीत सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आमच्या या मोर्चात इतर संघटना देखील सहभागी होणार असुन आम्ही सगळे मिळुन हा मोर्चा काढत असल्याचे सोनवणे यांनी सांगितले.आज बैठकीच्या सुरवातीला लोकमाता अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी निमित्ताने त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला यावेळी जेष्ठ महिलांच्या हस्ते वृक्षारोपण करून अहिल्याबाई होळकर यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी सचिव आशाबाई काकळीज, नफिसा शेख सुनीता कुलकर्णी गीता जस्वल कमलबाई पाटिल सुनीता टिळेकर रत्ना सोनवणे छाया निकम,सरला मोढे ज्योती मोरे चित्रा परदेशी शोभा भोसले मनीषा भाबड ,संगीता मोकळ यांच्यासह महिला सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
