
पुण्यश पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांची 300 वी जयंती पारगाव येथील पवित्र संगमेश्वर मंदिर परिसर स्वच्छता करून साजरी करण्यात आली. आंबेगाव तालुका भारतीय जनता पक्ष पूर्व भागाचे अध्यक्ष किरण वाळुंज यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. किरण वाळूज यांनी बोलताना सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे कार्य महान आहे.

जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत त्यांची कीर्ती आजारामर राहील. जारकरवाडी गावच्या मा. सरपंच रूपालीताई भोजने यांनी बोलताना सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांनी भारतातील अनेक मंदिरे, घाट आणि विविध धार्मिक स्थळांचा जिर्णोद्धार केला आहे. शंकर लबडे यांनी बोलताना सांगितले की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर फक्त एका समाजात नव्हत्या तर त्यांनी संपूर्ण देशाला एकात्मता शिकवली. सर्वांना समान न्याय देऊन सर्व धर्म समभाव जपला. पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या विचारावरती आपण सर्वांनी चालण्याचा प्रयत्न करू

. या कार्यक्रम प्रसंगी पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पुजन मा. नगरसेवक सोपान वायकर, मा. अध्यक्ष संदिप बाणखेले, सरचिटणीस श्री कृष्ण देशमुख, प्रमोद बाणखेले, अरविंद जी वळसे,केरभाऊ दौंड ,तान्हाजी लबडे, योगेश पोटे, गोरक्ष भोजणे, चेअरमन महेश भोजणे, बाळासो सुतार, माऊली क्षीरसागर, विजय आढाव, एकनाथ गावडे,यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमप्रसंगी मा. सरपंच रुपालीताई भोजणे, शंकर लबडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
