शब्दांकन:- अशोक मार्कंड सर , जेष्ठ शिक्षक . न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव.

बाणेश्वराच्या कृपा आशीर्वादाने ज्ञानदानाचे काम करणारे आमचे सहकारी, विविध उपक्रमात, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात सतत कृतिशील व्यक्तिमत्व श्री प्रकाश फणसे सर यांचा आज सेवा गौरव दिन…. अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दाने ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडवणारा, तत्त्वातून मूल्य फुलवणारा ज्ञानरूपी गुरू म्हणजे शिक्षक.. बालवयात मन व बुद्धीला संगमातून प्रवाहित होऊन ज्ञानगंगेचा प्रवाहात सहप्रवासी होऊन म.वि.प्र. या संस्थेतून सेवानिवृत्त होत आहेत.बाणगाव ही त्यांची जन्मभूमी…१३/११/१९९७ रोजी जनता विद्यालय जातेगाव येथे अर्धवेळ उपशिक्षक म्हणून ते म वि प्र संस्थेत रुजू झाले.शाळेतील व शाळेबाहेरील विविध सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रीयच नव्हे तर कृतिशील सहभाग असायचा या मुळे ते घाट माथ्यावर लोकप्रिय झाले . सप्टेंबर२००५ मध्ये त्यांची न्यू इंग्लिश स्कूल नांदगाव या शाळेत पूर्णवेळ शिक्षक म्हणून नियुक्ती झाली.सांस्कृतिक विभागप्रमुख म्हणून त्यांचे काम वाखाण्याजोगे होते. विज्ञान प्रदर्शन , पालक मेळावे , स्काऊट गाईड मेळावा, विविध शिक्षक प्रशिक्षण ,टी. डी. एफ. संघटनेच्या माध्यमातून विविध आंदोलन. विविध विवाह समारंभातील निवेदन.. शाळेतील विविध उपक्रमांचे वार्तांकन..
यामुळे तालुक्यातील पत्रकारांनामध्ये त्यांच्याविषयी असलेला आदर… जातेगाव, भालूर व नांदगाव या शाखेत त्यांनी गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन केले. त्यांच्या नावातच प्रकाश आहे त्यांनी नावाप्रमाणे म. वि.प्र. संस्थेमध्ये गणित व विज्ञान विषयाचे अध्यापन करत असतानाच कर्तव्य कर्म यांची परखड गाठ बांधून सांस्कृतिक कार्यक्रम, विज्ञान मेळावे, विज्ञान परीक्षा ,उत्कृष्ट सूत्रसंचालन ,उत्तम फोटो ग्राफर , उत्कृष्ट मार्गदर्शक अशा अनेक भूमिका त्यांनी निभावल्या .विशेष म्हणजे शाळेतील विविध उपक्रमांचे फोटोसहित वार्तांकन फेसबुकच्या व सोसियल मीडियाच्या माध्यमातून साता समुद्राच्या पलीकडे पोहोचवण्याचं काम अविरतपणे येथे करत होते. असे सर्व गुण संपन्न अष्टपैलू व्यक्तिमत्त्व म्हणजे फणसे सर.. पाणी तेरा रंग कैसा जिसमे मिलाओ ऐसा तसे फणसे सर होते . जीवनात सर्वाच प्रकारचे रंग रंगवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. वयाने वृद्ध पण तारुण्याची तरुणाई अजून तशीच आहे. कारण कोणते काम सांगितले तर पायाला भिंगरी बांधून पूर्ण करण्याची क्षमता.. त्यांची कमाल आहे इतके ते चंचल आहे एखाद्या कार्यक्रमात गेले किंवा लग्न समारंभात गेले तर आयोजकापेक्षा किंवा लग्नातील वर बापा पेक्षा जास्त लोकांना भेटतात यावरून असे वाटते की त्यांचा लोकसंपर्क किती दांडगा आहे याची प्रचिती आपल्यासमोर येते. प्रत्येक नातं आपण समरसून जगलास ,आणि वेळ येताच , नातं त्यागून मोकळेपणा निर्माणपण केलास जीवनात अनेक नाती निभावलीस ‘ जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी सांगावे शहाणे करून सोडावे सकल जना’ अशा पद्धतीचे काम आपण अविरतपणे म.वि.प्र या संस्थेत केलं.संस्थेने त्यांच्याविषयी दाखविलेल्या विश्वासामुळे संस्थेविषयी ते ऋण व्यक्त करतात. आपल्याला उत्कृष्ट आरोग्य लाभो आपल्या हातून उत्तम कार्य होऊ दीर्घ आयुष्य मिळो अशी शुभेच्छा या ज्ञान संकुलाच्या वतीने करतो …त्यांना सेवापूर्तीच्या खूप खूप शुभेच्छा💐
