
आंबेगाव ( प्रतिनिधी)खडकी आंबेगाव तालुका | पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त स्वच्छता अभियान व महाआरती तसेच विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

..आज दिनांक 31 रोजी आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव या ठिकाणी कर्तुत्व,दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेचं तेजस्वी प्रतीक पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त आंबेगाव तालुका मध्य मंडळाच्या वतीने भाजपा जिल्हाध्यक्ष प्रदीप दादा कंद व भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.सकाळी 9 वा आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव ग्रामपंचायत कार्यालयासमोर राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले

त्या ठिकाणी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनपटावर प्रकाश टाकत उपस्थितांसोबत संवाद साधला तसेच ह.भ.प आदिनाथ महाराज जुन्नरकर,डॉ.राजेश पाटील, विठ्ठल बुळे व मान्यवरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्यानंतर बिरोबा मंदिर या ठिकाणी महाआरती करण्यात आली.तसेच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी आंबेगाव तालुक्यातील खडकी पिंपळगाव येथील घोड नदीवर बांधलेला नदी घाट तसेच तेथील देवस्थान परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. मंदिरात पूजा अर्चना करत सर्वांच्या समृद्धीसाठी प्रार्थना केली.यावेळी भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात,ह.भ.प आदिनाथ महाराज जुन्नरकर, तालुकाध्यक्ष स्नेहलताई चासकर,दत्ताशेठ बांगर (सरपंच),दत्ता शेठ हगवणे,भरत पोखरकर,डॉ राजेश पाटील, कालिदास गांजाळे,नवनाथ थोरात,गणेश थोरात,सुनित थोरात,भरत काळे सुभाष मावकर,अंकुश थोरात,सविताताई लबडे,प्रमिलाताई निराळे,तुळसा ताई गांजाळे, सविंद्र ताई गांजाळे,विद्याताई त्रिवेदी,सोनल देशमुख,अलकाताई गांजाळे,वसंत पाटील,कृष्णा भोर,मारुती वाबळे,पांडू पाटील,दादाभाऊ बांगर,बन्सी पाटील,किसन पाटील,कोंडीबा पाटील,शिवाजी पाटील,पंढरीनाथ बांगर,राजू पोखरकर,नवनाथ वाबळे, विकास वाघमारे,मारुती बोराडे, किरण पाटील व मोठ्या संख्येने ग्रामस्थ व मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अशोक भोर साहेब यांनी केले व आभार दीपक दादा बांगर यांनी मानले.
