
मोरेवाडी (प्रतिनिधी )राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लोकराज्य,समतेचा न्याय,जलनीती,धर्मरक्षक,उत्तम प्रशासक आदी गुण आपण अंगीकारल्यास समृद्धी नांदेल असे प्रतिपादन,मुख्याध्यापक बागुल सर यांनी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोरेवाडी येथे केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी बाळूभाऊ शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सर्वप्रथम अध्यक्षांच्या हस्ते व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अहिल्यादेवींच्या फोटोचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.

.राजमाता अहिल्यादेवी होळकर ह्या माणिकराव शिंदे यांच्या कन्या होत्या व कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी शिंदे कुटुंबातील व्यक्तीची निवड होणे हा योगायोग असल्याचे मुख्याध्यापक बागुल यांनी आपल्या भाषणात सांगितले.याप्रसंगी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मोरे,उपाध्यक्ष नवनाथ पवार,शिक्षणतज्ञ अविनाश कर्नर,पालक यादव मोरे,कैलास मोरे,सदाशिव मोरे,ज्ञानेश्वर सोनवणे,सोनू मोरे,कारभारी मोरे, अंकुश मार्कड , दिपक शिंदे,पांडुरंग शिंगाडे, बारकु मोरे,जिभाऊ मोरे आदी उपस्थित होते.छायाचित्रणाचे काम सुयोग बागुल यांनी केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्याध्यापक बागुल सर यांनी केले,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष बाळू शिंदे यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
