
. सेवानिवृत्ती प्रसंगी सातपूर जनता माध्यमिक विद्यालयात पर्यवेक्षक नंदकुमार न्याहारकर यांचा सेवानिवृत्ती निमित्त सत्कार प्राचार्य प्रमोद कांगुणे, उपस्थित उपमुख्याध्यापिका कविता शिंदे पर्यवेक्षक संजय ठाकरे, मीना पोटींदे आदी.
नाशिक: दि.३१ (वार्ताहर) येथील ‘मविप्र’ संस्थेच्या माधवराव बोरस्ते विद्यालयाचे उपशिक्षक व जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय सातपूरचे पर्यवेक्षक नंदकुमार न्याहारकर यांचा ३२ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्ती सोहळा बोरस्ते विद्यालय ओझर व जनता विद्यालय सातपूर येथे त्यांना सेवापूर्ती निरोप देण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सोपान वाटपाडे, प्राचार्य प्रमोद कांगुणे होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक धैर्यशील पाटील उपमुख्याध्यापिका कविता शिंदे पर्यवेक्षक दशरथ शिंदे संजय ठाकरे मीना पोटींदे उपस्थित होत्या. प्रास्ताविकात शिक्षक नरेंद्र डेरले व प्रशांत महाबळ यांनी पर्यवेक्षक नंदकुमार न्याहारकर यांच्या सेवा संदर्भात माहिती देताना, संस्थेच्या रामेश्वर नैताळे बाणगाव देशमाने जळगाव (गा) पिंपळद सिन्नर पाटोदा उसवाड देवरगाव काजीसांगवी मांडवड ओझर सातपूर या विद्यालयात सेवा करण्याची संधी मिळाली. प्रारंभी दोन वर्ष कातरणी, वाहेगावसाळ या स्थानिक संस्थेत अध्यापनाचे कामकाज केले पण या ठिकाणी फारसे मन रमले नाही म्हणून मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेत १९९४ मध्ये नोकरी स्वीकारली. ऑनलाइन अध्यापनासह कोविड काळात रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानून रुग्णांसाठी अतोनात परिश्रम घेतले. सन २००७ पासून जिल्ह्यातील विविध शाळा महाविद्यालयांचे उपक्रम प्रकल्प शिबिरे चर्चासत्रे कृती कार्यक्रम सोहळयांना प्रसिद्धी देण्यासाठी दैनंदिन अतिरिक्त वेळ देऊन राज्यातील नामांकित वृत्तपत्रात प्रसिद्धी व जाहिरातीचे प्रचंड काम केले. या शालेय व सामाजिक कार्याची दखल घेऊन समाज दिनानिमित्त त्यांना प्राचार्य सोपान वाटपाडे यांच्या हस्ते सर्वात प्रथम ‘मविप्र’ संस्थेचा मानाचा ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सोपान वाटपाडे, प्रमोद कांगुणे यांच्या हस्ते सत्कारमूर्ती पर्यवेक्षक नंदकुमार न्याहारकर यांना शाल श्रीफळ सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. उपमुख्याध्यापिका कविता शिंदे पर्यवेक्षिका मीना पोटींदे कलाशिक्षक अरुण सावंत यांनी व्यक्त केले. प्राचार्य सोपान वाटपाडे, प्राचार्य प्रमोद कांगुणे यांनी न्याहारकर यांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्वाचे कौतुक करीत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. फलक रेखाटन कलाशिक्षिका मोनाली निकम यांनी केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक प्रशांत महाबळ, नरेंद्र डेरले यांनी केले.
