
.
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२२ वा दिवस* कोण्या एका संस्कृत कवीने म्हटले आहे, “न गृहं गृहमित्याहुः गृहिणी गृहमुच्यते.” घराला घरपण येते गृहिणीमुळे नुसत्या घराला काही किंमत नाही. केवढे सत्य साठविले आहे या विधानात! जे घर थंडीवाऱ्यापासून रक्षण करते त्या घराच्या गुणदोषांचे विवेचन करताना ते ज्या खांबांवर उभे आहे त्यांचाच नुसता विचार करून भागणार नाही, मग ते खांब ‘कॉरिन्थियन स्तंभा’ प्रमाणे कितीही सुबक खोदकामाने शृंगारलेले असोत. घराचा विचार करावयाचा झाल्यास लक्षात घ्यायला हवा तो ‘चेतन स्तंभ’ ज्यावर खरोखर ते घर उभे असते. तो स्तंभ म्हणजे गृहिणी हा होय. *स्वामी विवेकानंद..
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १० जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ५
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शनिवार दि. ३१ मे २०२५
★ जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन.
★ १७२५ पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर ३०० वी जयंती.
★ राजमाता अहिल्यादेवींच्या पवित्र स्मृतीस शतशः नमन…
*संकलन – प्रा. अमोल श्रीकृष्ण अहिरे, नाशिक*
