
नाशिक (प्रतिनिधी ) संपूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीचा लढा उभारण्यासाठी नाशिक येथे भव्य कर्जमुक्ती मेळावा ठिकाण अनंत कन्हेरे मैदान शेजारी कर्जमुक्ती आंदोलन स्थळावर होणार असल्याची माहिती समिती अध्यक्ष भगवान बोराडे यांनी दिली आहे ! नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या आणि लिलावाच्या विरोधात 1 जून 2023 पासून सिव्हिल हॉस्पिटल च्या समोर दोन वर्षापासून धरणे आंदोलन सुरू आहे.

या धरणे आंदोलनाला आता 1 जून 2025 ला दोन वर्षे पूर्ण होत आहे. त्या निमित्त येत्या 1 जून 2025 रोजी शेतकऱ्यांचा कर्जमुक्ती मेळावा नाशिक येथे अनंत कन्हेरे मैदान येथे घेण्यात आला आहे. या कर्जमुक्ती मेळाव्यासाठी प्रमुख अतिथी छत्रपती संभाजी राजे भोसले , आणि अर्थतज्ञ विजय जावंदिया हे असणार आहेतसेच प्रमुख उपस्थिती वारकरी सांप्रदायाचे आचार्य रामकृष्ण दासजी महाराज लीवितकर नाशिक, सामाजिक व राजकीय संघर्ष करणारे शांतिगिरी महाराज नाशिक शेतकऱ्यांचे संघर्ष योद्धे माननीय श्री अनिलजी गोटे ज्येष्ठ साहित्यिक माननीय श्री धनंजय पाटील काकडे अमरावती शेतकरी झुंजार नेते माननीय श्री लक्ष्मण वडले जालना शरद जोशी विचार मंचाचे अध्यक्ष माननीय श्री विठ्ठल राजे पवार सीता मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष माननीय श्री चंद्रकांतजी ऊर्फ बाळासाहेब देशमुख, यवतमाळ, हे महाराष्ट्रातील अग्रगण्य शेतकरी नेते आणि सांप्रदायातील महंत उपस्थित राहणार आहे . तरी या कार्यक्रमाला बहुसंख्येने सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन कर्जमुक्ती आंदोलनाचे सेनापती भगवान बोराडे, आदिवासी नेते कैलास बोरसे, समन्वय समिती सदस्य श्री दिलीप पाटील , शेतकरी नेते सुधाकर मोगल निफाड, शेतकरी नेते नानासाहेब बच्छाव आयोजक संघटना शेतकरी संघटना समन्वय समिती, आदिवासी संघर्ष समिती, व नाशिक जिल्हा नागरिक कृती समितीच्या वतीने आयोजकांनी केले आहे !
