
दोंडाईचा-(प्रतिनिधी ) आपल्या समाजात आजही जुणे-जाणते लोक म्हणतात की, एकवेळ घरी चटणी-भाकर खाल्लेली बरी.पण पोलीस स्टेशन-कोर्ट कचेरी-दवाखानाची पायरी न चढलेली बरी. कारण पोलीस स्टेशन-कोर्ट कचेरी-दवाखाना ह्या ठिकाणी काही मिळते तर ते म्हणजे फक्त दु:ख न दु:ख-यातना-त्रास, तेही खिसे खाली करून.म्हणजे माणसाने राबराब राबून, कष्टाने पै-पै पैसा जमविला असेल आणि त्याच्यावर जर वरील पैकी एकाही ठिकाणची पायरी चढायची वेळ आली तर खिसा तर खाली होतोच पण त्यासोबत अनमोल आयुष्यही वाया-निघून जाते व पदरी काही मिळते तर निराशा-दु:ख. पण वरील तिघा परिस्थिती पैकी दवाखान्या सारख्या ठिकाणी दु:ख-वेदना-त्रास- शस्रक्रीयासारख्या काळातही जीवन जगण्याचा आनंद माणूस कसा शोधून काढतो,हे खुप कमी ठिकाणी पहायला-ऐकायला दुर्मीळ मिळते आणि आज अशाच दुर्मीळ घटनेची चर्चा करावीशी वाटते

.ते म्हणजे दोंडाईचा येथील माजी नगरसेवक व नगरसेविका पती-पत्नी श्री किशनभाई दोधेजा व सौ.गिताबाई किशन दोधेजा.वरून तर हे परिवार सर्व गोष्टींनी सुखी व समाधानी आहे.पण दु:ख केव्हा कोणाच्या आयुष्यात कधी चालून येईल. हे कोणालाही सांगता येत नाही.म्हणून मागील दहा दिवसांपूर्वी रोजचे दैनंदिन हसतखेळत जीवन परिवारासोबत जगत असताना रात्रीच्यावेळी श्री किशनभाई दोधेजा यांना युरीन स्टापचा प्राॅब्लेम निर्माण झाला.तो त्रास ऐवढा त्रासदायक होता की, पुर्ण परिवार पहाट होण्याची वाट पाहत होता आणि पहाट जशी झाली तसे त्यांनी स्थानिक डॉक्टरांना दाखविले.स्थानिक डॉक्टरांनी पहाटेची फी घेऊन,युरीन नळी-बॅग तर लावून दिली.पण त्रासांवर निदान काही मिळाले नाही.मग त्यांनी त्याच दिवशी धुळे गाठले.धुळ्याच्या डॉक्टरांनी सर्व टेस्ट करायला भाग पाडले.पण टेस्टचा रिपोर्ट आल्यावरच पुढे काय करायचे किंवा करायचे नाही असे सांगितले.शेवटी चार दिवसांनी प्रोस्टेट चा रिपोर्ट आला.धुळ्याच्या डॉक्टरांच्या माणसांनी फोनवरच प्रोस्टेटचा रिपोर्ट १.१० नाॅर्मल असल्याचे सांगून,डॉक्टरांना उद्या भेटायला या असे सांगितले.त्यामुळे श्री किशनभाईंना पण एकीकडे वाटले शस्त्रक्रिया वगैरे काय होणार नाही.दवा-गोळ्यावरच आपले काम मिटेल.म्हणून दुसऱ्या दिवशी मोठ्या आंनदी-उत्साहाने भेटायला गेले.पण रस्त्यात युरीन स्टाॅपचा त्रास अधुनमधून सुरू होता.दवाखान्यात पोहचल्यावर डॉक्टरांना सांगितले की,त्रास होत आहे.तेव्हा डॉक्टरांनी सांगितले की, प्रोस्टेट ग्रंथीचा रिपोर्ट जरी नाॅर्मल आला आहे. तरी शस्त्रक्रिया करावी लागेल.जेणेकरून भविष्यात प्रोस्टेट ग्रंथी वाढता कामा नये.पुन्हा डॉक्टरांनी श्री किशनभाईंना फिटनेस वगैरे टेस्ट करायला सांगितल्या. दुसरीकडे श्री किशनभाईही ॲडमिट होण्याच्या उद्देशानेच घरून सर्व पैशांची तयारी करून निघाले होते.त्यासाठी फिटनेस सर्व टेस्ट केल्या व डॉक्टरांना भेटून ॲडमिट व्हायला गेले तर डॉक्टर दुसऱ्या दिवसापासून पुढील आठ दिवस बाहेर दौऱ्यावर जाणार होते.म्हणून पुन्हा शस्त्रक्रिया आठ दिवसांवर गेली.श्री किशनभाई निराश चेहरा घेऊन घरी परत आले.म्हणजे खिशात पैसा-मनाची त्रासातुन बरे होण्यासाठी शस्त्रक्रिया करण्याची तयारी पण नशीब गांडू की डॉक्टर दुसऱ्या दिवसापासून बाहेर गावी.म्हणून जो त्रास होता तो सुरूच होता.म्हणून दुसऱ्या दिवशी श्री किशनभाईंनी पुन्हा धुळे गाठले व रेल्वे स्टेशन जवळील सर्वात जुने युरोलाॅजीस्ट यांना भेटायला गेले.त्यांनी कोणतीही फाईल-रिपोर्ट-टेस्ट न बघता,स्व:ताच्या अनुभवातून पेशंटला तपासले व जो सल्ला दिला, त्या सल्ल्यावर पेशंटचा लगेच विश्वास बसला की,येथे लुट-दिरंगाई नाही तर त्रासांवर लगेच-तात्काळ निदान केले जाते.म्हणून श्री किशनभाईंनी दुसऱ्याच दिवशी ॲडमिट होऊन शस्त्रक्रीया करण्याचा निर्णय घेतला व दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रीया यशस्वीही झाली.मग तिसऱ्या दिवशी म्हणजे आज श्री किशनभाई व सौ.गिताबाई दोधेजा यांचा लग्नाचा ५३ वा वाढदिवसही, त्यासाठी दोंडाईचाहून परिवार व मित्र कंपनी आली व हाॅस्पीटलच्या कर्मचाऱ्यांच्याही लक्षात आले, त्यांनी डॉक्टरांना कल्पना दिली व सर्वांनी मिळून-सर्वाच्या साक्षीने ह्या माजी नगरसेवक व नगरसेविकेचा हाॅस्पीटल-शस्रक्रीया-त्रास-दु:खाच्या काळातही ५३ व्या लग्नाच्या वाढदिवसाचा आनंद द्विगुणित-मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. ह्या शस्त्रक्रीया पल्स लग्नाच्या वाढदिवसाच्या परिस्थितीवर माजी नगरसेवक श्री किशनभाई दोधेजा यांची प्रतिक्रीया घेतली असता त्यांनी सांगितले की, मागच्या लग्नाचा वाढदिवस मी परिवारासोबत गोवा येथे साजरा केला होता.पण कोणाला माहीत की, पुढील लग्नाचा वाढदिवस म्हणजे आजचा वाढदिवस आम्ही हाॅस्पीटलमध्ये साजरा करू. म्हणून कोणालाच उद्या आपल्या आयुष्यात काय घडले हे सांगता येत नाही. म्हणून परमेश्वर-भोलेनाथ बाबा आपल्याला सुख:असो का दु:ख, त्रास-वेदणांच्या काळात ज्याला जीवन जगण्याचा आनंद घेता आला,तोच खरा सुखी,असे आनंदी जीवन जगण्याचे मंत्र त्यांनी शेवटी बोलता-बोलता सांगितले आहे.
