
अहिल्यानगर ( भागवत झाल्टे ) – 28 मे रोजी अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांसह मुसळधार पावसामुळे खंडाळा, वाळकी, खडकी या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले. पावसाचे पाणी घरांमध्ये घुसल्याने संपूर्ण परिसर जलमय झाला. अनेक नागरिक, जनावरे आणि वाहने पुराच्या पाण्यात अडकली होती. या संकटाच्या वेळी अहिल्यानगर पोलीस स्टेशनचे दबंग एपीआय गीते साहेब यांनी दाखवलेली धाडस आणि तत्परता समाजासाठी आदर्श ठरली आहे.
पूरस्थिती अत्यंत गंभीर होती. नागरिक घरात अडकले होते, जनावरांना बांधावर नेण्याची सोय नव्हती, आणि रस्त्यावरची वाहने पाण्यात बुडाली होती. परिस्थिती हाताबाहेर जात असताना, एपीआय गीते साहेबांनी कोणतीही भीती न बाळगता स्वतः बचाव कार्यात उडी घेतली.

गीते साहेबांनी पोलीस पथकासह घटनास्थळी पोहोचून नागरिकांचे प्राण वाचवण्यासाठी अपार मेहनत घेतली. त्यांनी अनेक कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवले, अडकलेल्या जनावरांना बाहेर काढले, आणि दुचाकी-चारचाकी वाहने सुरक्षित ठिकाणी हलवली. पाणी कंबरेपर्यंत असतानाही त्यांचा आत्मविश्वास डगमगला नाही.
स्थानिक नागरिकांनी त्यांच्या या धाडसी आणि सेवाभावी वृत्तीचे भरभरून कौतुक केले. संकटाच्या वेळी प्रशासनाची मदत वेळेवर मिळाल्यामुळे संभाव्य हानी टळली. “गीते साहेबांसारखे अधिकारी पोलिस दलात आहेत म्हणूनच आम्हाला सुरक्षा वाटते,” असे गौरवोद्गार गावकऱ्यांनी काढले.
आजच्या काळात एपीआय गीते साहेबांनी दिलेले हे कार्य समाजासाठी प्रेरणादायी आहे.
त्यांच्या धाडसाला आणि सेवाभावी वृत्तीला भगवा सलाम!
