
. सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९२१ वा दिवस* भारत मातेच्या शूर, वीर, सामर्थ्यवान योद्ध्यांनो ! आपल्या योजनांवर काम करण्यासाठी स्वतःची सर्व शक्ती वेचा. झोकून देऊन काम करा. तुम्ही सर्व शक्तिमान, सर्वज्ञ, सामर्थ्यशाली आहात, असा आत्मविश्वास सदैव अंगी बाळगा. आपल्यात दुर्दम्य इच्छाशक्ती जागृत करा. आपल्यातील आशावाद व सकारात्मकता सतत वाढीस लागली पाहिजे. आपल्यातल्या सुप्तशक्तीला आवाहन करा. मग पहा ती कशी जागृत होऊन कार्यप्रवण होते. ही सुप्त आत्मशक्ती जागृत कार्यशक्तीच्या रूपात प्रकट झाली म्हणजे तुमच्यात सामर्थ्य येईल, वैभव येईल, सद्गुण येतील, सुचिता येईल, त्यागी वृत्ती येईल. जे उदात्त, उत्तम, उन्नत आहे ते सारे काही येईल. *स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●*
*★ भारतीय सौर ९ जेष्ठ शके १९४७*
★ जेष्ठ शुध्द /शुक्ल ४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ शुक्रवार दि. ३० मे २०२५
★ १८९४ इतिहासकार डॉ. पांडुरंग सखाराम पिसुर्लेकर यांचा जन्मदिन
★ १९१६ अत्यंत लोकप्रिय, प्रतिभावंत चित्रकार दीनानाथ दलाल यांचा जन्मदिन
★ १९३४ मुंबई नभोवाणी केंद्राची सुरुवात.
★ १९५० प्राच्यविद्या संशोधक दत्तात्रय रामकृष्ण भांडारकर यांचा स्मृतीदिन.
★ गोवा मुक्ती दिन
★ राष्ट्रीय सर्जनशीलता दिवस
