
नाशिक (प्रतिनिधी)मविप्र दरवर्षी विविध क्षेत्रातील उत्तमोत्तम अभ्यासक्रम आणि करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देत असते. MCA हा पदव्युत्तर अभ्यासक्रम, संगणक शास्त्रात पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टीने एक अतिशय उत्तम पर्याय आता मविप्र मध्येच उपलब्ध झाला आहे. इन्स्टिटय़ुट ऑफ मैनेजमेंट, रिसर्च अॅण्ड टेक्नॉलॉजी (आय. एम. आर. टी.) महाविद्यालय तसेच कॉमर्स, मैनेजमेंट अॅण्ड कम्प्यूटर सायन्स महाविद्यालय (सी.एम.सी. एस.) नाशिक या दोन्ही व्यवस्थापन महाविद्यालयांना शैक्षणिक वर्ष २०२५—२६ साठी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेमार्फत एमसीए (मास्टर इन कॉम्प्युटर एप्लीकेशन) या पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठीची मंजुरी नुकतीच प्राप्त झाली आहे. एम. सी. ए. हा कोर्स सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न असेल व दोन्ही महाविद्यालयात प्रत्येकी ६० जागांची प्रवेश क्षमता असलेल्या या अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रीया महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या एम. एच. सीईटी या सामाईक प्रवेश परीक्षेच्या मार्फत पार पडेल -ॲड. नितीन बाबुराव ठाकरे, सरचिटणीस, मविप्र, नाशिक यांनी सांगितले
