
इगतपुरी (तालुका प्रतिनिधी)- नवनाथ गायकर यांजकडुन——— ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघाच्या माजी आमदार तथा उ.बा.ठा. शिवसेना गटाच्या उपनेत्या सौ. निर्मलाताई गावित यांनी उबाठाला सोडचिठ्ठी देत उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान सौ.गाविताच्यां शिवसेना प्रवेशाने उबाछा गटाला मोठा धक्का बसला असुन पक्षाचे अस्तित्वच धोक्यात येते कि काय अशी शंका उपस्थित होते आहे, तर दुसरीकडे त्यांच्या प्रवेशाने शिवसेना पक्ष मजबुत होणार आहे.सौ.गावित यांच्या प्रवेशाने शिवसेनेची ताकद वाढुन आगामी जि.प.,प.स च्या निवडणुकीवर याचे मोठे परिणाम होणार आहेत. सौ.गावित यांनी वडिल दिवंगत केंद्रीय राज्यमंत्री माणिकराव गावित यांचा राजकिय वारसा चालवत कॉलेज पक्षातुन राजकारणाची सुरुवात केली. नाशिक मनपात त्या दोनवेळा नगरसेविका झाल्या तर ईगतपुरी त्रंयबकेश्वर विधानसभा मतदारसंघातुन कॉग्रेस पक्षाच्या उमेदवारीवर त्या दोनदा आमदार झाल्या होत्या. मात्र त्यानंतर पुढील विधानसभा निवडणुकीत पक्ष सोडण्याची चुक त्यांना महागात पडली.कॉग्रेस सोडुन त्या उद्धव ठाकरेच्यां नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केला.मात्र विधानसभा निवडणुकीत त्यांना ऐनवेळी रा.कॉ.कडुन उसने घेतलेले कॉग्रेस उमेदवार हिरामण खोसकर यांनी सौ.गावित यांचा पराभव केला. त्यानंतर सौ. गावित या काहिशा विजनवासात गेल्या.कौटुंबिक आपत्तीमुळे त्या काहिशा खचल्या होत्या. सन २०२४ मध्ये विधानसभा निवडणुकीत कार्यकर्त्याच्यां आग्रहावर त्यांनी अपक्ष उमेदवारी करत प्रबळ आव्हान खोसकरानां दिले खरे, पण महायुतीच्या झंझावातापुढे त्या पुन्हा पराभुत झाल्या. ईगतपुरी त्रंयबकेश्वर या दोन्ही तालुक्यात शिवसेनेकडे माजी आमदार काशिनाथ मेंगाळ यांचे रुपाने समर्थ नेतृत्व होते,मात्र त्यांनी पक्षाशी बंडखोरी करत मनसेचा पदर धरल्याने शिवसेनेत नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती. मात्र आता सौ.निर्मला गावित यांचे शिवसेना प्रवेशाने मतदारसंघात शिवसेनेची ताकद वाढली आहे.याचा फायदा आगामी जि.प.,पं.स. निवडणुकीत पक्षाला मोठया प्रमाणावर होणार आहे.या शिवाय महायुती सत्तेत असुनही रा.कॉ.चे आमदार हिरामन खोसकर यांचेसह रा.कॉ.चेच वर्चस्व असल्याने शिवसेनेची येथे घुसमट होत होती.ती आता गाविताच्यां आगमनाने थांबणार आहे.*खोसकरानां शह कि सहकार्य ?* माजी आमदार सौ.निर्मला गावित या शिवसेना प्रवेश करुन महायुतीत सामिल होत आहे.या मतदारसंघात महायुतीचे हिरामन खोसकर हे आमदार आहेत. विशेष म्हंणजे सौ.गावित व खोसकर हे एकमेकाचे पारंपारिक प्रतिस्पर्धी आहेत. आता दोघेही महायुतीत असल्याने दोघाचें सबंध मधुर होतात कि शह काटशहाचे राजकारण सुरु होते हे पाहणे औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकीवर या प्रवेशाचे दुरगामी परिणाम होणार आहे हे निश्चित.
