
नाशिक (प्रतिनिधी )राहुल गांधी नाशिकला न्यायालयात हजर झाल्यास संभाजी ब्रिगेड त्यांच्या संरक्षणार्थ उभी राहील – संतोष गायधनी जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,नाशिक.’माफीवीर’ प्रकरणी राहुल गांधींना नाशिक न्यायालयाने समन्स बजावले आहे,त्या पार्श्वभूमीवर उबाठा गटाकडून त्यांच्यावर दगडफेक करण्याची,त्यांना काळे फासण्याची धमकी दिली गेली आहे.मात्र वैचारिक भूमिकेवर संभाजी ब्रिगेड राहुल गांधींच्या पाठीशी उभी राहील,त्यांचे संरक्षण करेल.मुळात माफीवीर प्रकरणी उबाठा गटात प्रचंड गोंधळ आहे.त्यांना आदर्श मानायचे की त्यांचा उपहास करायचा या विचित्र पेचात उबाठा सद्यस्थितीत अडकलेली दिसते.सावरकरांनी माफी मागितली याबद्दल दुमत असण्याचे कारण नाही,त्यांनी इंग्रजांकडून पेन्शन घेतली,इंग्रजांना शरण जाऊन त्यांच्या सैन्यात भरती होण्यासाठी येथील जनतेला आवाहन केल्याचेही इतिहासात नमूद आहे.गांधी हत्येप्रकरणी देखील त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केल्याचेही सर्व जाणतात.त्याच अंदमान कारावासात माफी न मागता देशासाठी तुरुंगवास भोगून,नरकयातना भोगून जीवन तेथेच त्यागून देशासाठी मरण पत्करणारे अनेक क्रांतिकारक हेच खरे स्वातंत्र्यवीर आहेत.देशविरोधी इंग्रजांना मदत करणारे,ज्यांना जग महात्मा म्हणते त्यांच्या हत्येच्या कटात सहभागी असणारे,इंग्रजांची माफी मागणारे इंग्रजांचे पेन्शनधारक सावरकर स्वातंत्र्यवीर कसे?संभाजी ब्रिगेड,नाशिकच्या वतीने आम्ही उबाठा गटाला आवाहन करतो,समोरासमोर चर्चा करावी,मुद्दयाला मुद्द्याने उत्तर द्यावे.गुद्याची भाषा केल्यास संभाजी ब्रिगेड स्टाईलने त्यांना उत्तर दिले जाईल.आम्ही या वैचारिक व सांस्कृतिक लढाईत राहुल गांधी यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत.
