
मखमलाबाद ( वार्ताहर ) — मराठा विद्या प्रसारक समाजाचे श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय,मखमलाबाद येथील एस.एस.सी.परीक्षेचा निकाल ९७.००% लागला.या परीक्षेसाठी विद्यालयातील एकुण ५३१ विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते,त्यापैकी ५१५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.१८६ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले असुन प्रथम पाच क्रमांक पुढील प्रमाणे**१} कु.साई गजानन पवार = ९५.००%**२} कु.प्रथमेश बालाजी मुंडे = ९४.२०%**३} कु.रोशनी सोमनाथ महाले = ९४.००%**४} कु.प्रेम भाऊसाहेब गवळी = ९३.६०%**५} कु.अथर्व रविकांत झाल्टे = ९३.४०%* *या सर्व प्रथम पाच क्रमांकांचे व ९०% वरील अशा एकुण १९ विद्यार्थ्यांचे मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांच्या शुभहस्ते प्रमाणपत्र,गुलाबपुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.याप्रसंगी व्यासपिठावर पालक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष पहिलवान वाळू काकड,स्कुल कमिटी सदस्य राजेंद्र ढबले

,पालक,प्राचार्य संजय डेर्ले,उपप्राचार्या विमल रायते,पर्यवेक्षक सुनिल पाटील,ज्युनिअर काॅलेज प्रमुख प्रा.विकास थोरात उपस्थित होते.विद्यार्थी,पालक यांनी मनोगत व्यक्त केले.मविप्र संचालक रमेश आबा पिंगळे यांनी अध्यक्षीय भाषणात सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करुन अभिनंदन केले व भरभरुन मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.तसेच प्रा.विकास थोरात यांनी ११ वी आॅनलाईन प्रवेशासंदर्भात बहुमोल असे मार्गदर्शन केले.जेष्ठ शिक्षिका दिपाली कोल्हे यांनी सुत्रसंचालन केले व आभार मानले.कार्यक्रमासाठी पालक वर्ग,सर्व शिक्षकवृंद,शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
