
मंचर (प्रतिनिधी )पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी आंबेगाव मध्य मंडळ च्या वतीने ऑनलाईन निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले..कर्तृत्व,दूरदृष्टी आणि न्यायप्रियतेचं तेजस्वी प्रतीक!” “पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टी,मध्य मंडळ आंबेगाव तालुका यांच्यावतीने”पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर आधारित भव्य ऑनलाइन निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती भाजपा नेते जनसेवक श्री संजय जिजाबा थोरात व तालुकाध्यक्ष भाजपा स्नेहल चासकर यांनी दिली. स्पर्धेची वेळ :- रविवार 25 मे ते बुधवार २८ मे २०२५ पर्यत
विषय :- अहिल्याबाई होळकर यांचे धार्मिक कार्य | अहिल्याबाई होळकर आणि आधुनिक भारत,अहिल्याबाई होळकर एक प्रेरणास्त्रोत आणि अहिल्याबाई होळकर आणि महिला सबलीकरण..यात विजेत्यांना :-प्रथम बक्षीस – ₹5000,
द्वितीय बक्षीस – ₹3000,
तृतीय बक्षीस – ₹2000
टीप :- नागरिकांनी,विद्यार्थ्यांनी, महिलांनी आपला निबंध दिलेल्या नंबर वर पीडीएफ स्वरूपात पाठवावा व निबंधावर आपले नाव,पत्ता,मोबाईल नंबर लिहिलेला असावा..तरी आंबेगाव मध्य मंडळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी, या अभिमानास्पद निबंध स्पर्धेमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा ही नम्र विनंती.
आयोजक – भारतीय जनता पार्टी मध्य मंडळ आंबेगाव तालुकाजनसेवक श्री संजय भाऊ थोरात मित्र परिवार….चला आपल्या लेखणीतून पुण्यश्लोक अहिल्याबाईंच्या कार्याला अभिवादन करुया.
