
मौजे सुकेणे ता निफाड विद्यालयातील दहावी गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ प्रसंगी प्राचार्य रायभान दवंगे, विठ्ठल पवार, किशोर हांडोरे व आदी
कसबे सुकेणे( प्रतिनिधी) ता 26- मौजे सुकेणे ता निफाड येथील कर्मवीर रावसाहेब थोरात माध्यमिक विद्यालयातील फेब्रुवारी/ मार्च 2026 झालेल्या दहावी बोर्ड परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला अध्यक्षस्थानी प्राचार्य रायभान दवंगे होते प्रास्ताविक कॉलेज विभाग प्रमुख प्रा राजेंद्र धनवटे यांनी केले याप्रसंगी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार प्रमुख अतिथी व प्राचार्य दवंगे यांच्या शुभहस्ते करण्यात आला कार्यक्रमासाठी विज्ञान विभाग प्रमुख प्रा सचिन भंडारे,भारत मोगल, रावसाहेब शेलार, सोमनाथ मत्सागर, किशोर हांडोरे, विठ्ठल पवार, दिनकर रसाळ, पंकज खालकर,संजय पवार,महेश निकम,विजय मोगल, माहेश्वरी मत्सागर,पूजा बोराडे, साहेबराव आहेर, सुनील टर्ले, हरिदास विधाते आदी उपस्थित होते अध्यक्षीय मनोगतातून प्राचार्य दवंगे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया संबंधी माहिती दिली सूत्रसंचालन भारत मोगल यांनी तर आभार रावसाहेब शेलार यांनी मानले कार्यक्रमाप्रसंगी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी,पालक व विद्यार्थी उपस्थित होते
