
:राष्ट्रीय माथाडी व जनरल कामगार संघटना प्रणित राष्ट्रीय नगरपंचायत कामगार संघटना तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (D, S ) यांनी वेळोवेळी केलेल्या आंदोलनाला व पाठपुराव्याला मोठे यश मिळाले असून नगरपंचायत कामगार अनेक वर्ष किमान वेतनाच्या फरकापासून वंचित होते त्यांना किमान वेतणाचा फरक अदा करण्याबाबतचा आदेश मा. जिल्हाधिकारी कार्यालय नगरविकास शाखेमार्फत देण्यात आला त्यामुळे कामगारांना दिलासा मिळाला असून फरक मिळावा यासाठी कामगारांनी वेळोवेळी आंदोलन केले होते तसेच दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी स्वतः संघटनेचे अध्यक्ष तथा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष कैलासभाई पगारे यांनी दिंडोरी येथे आमरण उपोषण सुद्धा केले होते तसेच मुंबई आझाद मैदान येथे संघटना व पक्षाचे वतीने धरणे आंदोलन सुद्धा करण्यात आले होते त्याची दखल शासनाने घेऊन आदेश पारित केल्याने कामगारांमध्ये उत्सहाचे वातावरण आहे तरी आता प्रत्यक्षात कामगारांना फरकाची रक्कम नगरपंचायत कधी देणार? याची कामगार वाट पाहत आहेत*
