
रामराजे वमन तालुका प्रतीनीधी कळंब कळंब:- येथील प्रसिद्ध साहित्यीक के.व्ही. सरवदे लिखित “बळ आले पंखा” या चरित्रात्मक कादंबरीचे प्रकाशन शुक्रवार दिनांक ३० मे रोजी शुभ मंगल कार्यालय (बलाई) कळंब येथे सकाळी ११.३० वाजता संपन्न होत आहे कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आंबेडकरी चळवळीतील प्रसिद्ध साहित्यिक योगीराज वाघमारे सोलापूर हे उपस्थित राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी प्रा.डॉ.संजय कांबळे हे आहेत प्रमुख वक्ते रमेश बोर्डेकर, बी. एन.शिलवंत,सी.आर.घाडगे,सिध्दार्थ सुर्यवंशी,अविनाश शिवशरण,गोकुळ गायकवाड,यु.डी.गायकवाड,मा.डॉ. पंडीत कांबळे (किल्लारीकर ),मा. प्रकाश शिंदे,पु.भन्ते बुध्दशिल हे आहेत कार्यक्रमाचे प्रकाशकीय प्रवीण भाकरे प्रास्ताविक लेखक म्हणून के.व्ही.सरवदे तर सूत्रसंचालन विशाल वाघमारे तर आभार प्रदीप चंदनशिवे हे मानणार आहेत कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजन समितीच्या वतीने प्रशांत व आनंद गायकवाड,अमोल सरवदे यांनी केले आहे.
