
नांदगाव,दि 25 (मुक्ताराम बागुल):- नांदगाव तालुक्यातील पूर्व भागात असलेल्या घाट माथ्यावरील जातेगाव येथील विवाहित अर्चना संतोष तुपे वय वर्ष 35 या विवाहितेने आपल्या राहते घराच्या छताच्या पत्र्याच्या लोखंडी पईपाला दिनांक 24 मे 2025 रोजी शनिवारी रात्री अकरा वाजेच्या नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली. असून गावात सर्वत्र हळहळ व्यक्त केले जात असून या आत्महत्या बाबत तर्कवितर्क काढले जात आहे. त्याबाबत सविस्तर वृत्त असे की, नांदगाव तालुक्यातील जातेगाव येथील विवाहित महिला अर्चना संतोष तुपे वय वर्ष 35 हिने आपल्या राहत्या घराच्या छताच्या पत्र्याच्या लोखंडी पाईपला दिनांक 24 मे 2025 रोजी शनिवारी रात्री अकरा वाजेच्या नंतर गळफास घेऊन आत्महत्या केली असून सदर घटनेची माहिती 25 मे 2025 रोजी रविवारी सकाळी पोलिसांना मिळताच पोलिसांनी कोणताही विलंब न करता सदर घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अर्चना संतोष तुपे या मयत विवाहितेला नांदगाव येथील ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी पाठविले असता नांदगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी यांनी सदर मयत विवाहित अर्चना संतोष तुपे हिची तपासणी करून तिला मयत घोषित केले व शविछेदन केले. सदर विवाहितेचा दिनांक 25 मे 2025 रोजी रविवारी सायंकाळी चार वाजेच्या दरम्यान जातेगाव येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. सदर घटनेची माहिती मयत विवाहित अर्चना संतोष तुपे हिचा भाऊ युवराज शांताराम सोनवणे वय वर्ष 25 राहणार वाकला तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजी नगर यांनी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीवरून 37/2025 नुसार 194 प्रमाणे नांदगाव पोलीस स्टेशन मध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नांदगाव पोलीस स्टेशनची पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार केशवराव सूर्यवंशी, बच्छाव हे पुढील तपास करत आहेत.
