
नांदगाव,दि.25 (मुक्ताराम बागुल):- नांदगाव तालुक्यातील घाट माथ्यावर पूर्व भागात असलेल्या बोलठाण येथे ग्रामसभेत जॉब कार्ड ची मागणी केल्यानंतर बोलठाण ग्रामपंचायतचे कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी मगर यांनी सदर तक्रारीची तातडीने दखल घेऊन जॉब कार्ड वाटप चालू केले आहे. त्यामुळे बोलठाण ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी मगर यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बोलठाण यांनी मनस्वी आभार व्यक्त करत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, नांदगाव तालुक्यातील बोलठाण येथील ग्रामसभेत नागरिकांनी जॉब कार्ड ची मागणी केली होती. सदरची मागणी केल्यानंतर बोलठाण ग्रामपंचायत कर्तव्यदक्ष ग्रामपंचायत अधिकारी मगर यांनी सदर मागणी लक्षात घेऊन तातडीने दखल घेऊन जॉब कार्ड वाटप चालू केले आहे. सर्व जॉब कार्डधारकांनी मागणी केली होती. त्यांनी त्वरित ग्रामपंचायतीशी संपर्क साधावा व रोजगार हमी योजने मार्फत आपल्याला दिलेल्या कामावर जाऊन शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. ज्यांनी मागणी केली नसेल त्यांनी पण कामाची मागणी बोलठाण ग्रामपंचायतीकडे करावी. असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्यातर्फे आव्हान करण्यात येत आहे. बोलठाण ग्रामपंचायतीचे ग्रामपंचायत अधिकारी श्री मगर यांनी कामात आघाडी घेतल्याबद्दल ग्रामपंचायत अधिकारी मगर यांचे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बोलठाण यांनी मनस्वी आभार व्यक्त केल्याची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
