
नाशिक (प्रतिनिधी )सुपर ५० उपक्रमांतर्गत यंदाच्या वर्षी १०० विद्यार्थ्यांसाठी NEET व JEE Advance या परीक्षेसाठी दोन वर्षाचे निःशुल्क, निवासी कोचिंग “* ०८जुन २०२५रोजी होणार निवड चाचणी, १ जुन २०२५ रात्रौ १२.०० वाजेपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख*नाशिक : जिल्हा परिषदेच्या वतीने मागील वर्षी राबविण्यात आलेला सुपर ५० हा उपक्रम यावर्षीही राबवण्यात येत असून यासाठी विद्यार्थ्याना ऑनलाइन प्रवेश अर्ज सादर करण्यास १ जुन २०२५ रात्रौ १२.०० वाजेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ८ जून २०२५ रोजी यासाठी परीक्षा घेण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यानी यामध्ये जास्तीत जास्त सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. शैक्षणिक वर्ष सन २०२५ -२६ व २०२६ -२७ या दोन वर्षांसाठी सदर उपक्रमास एकुण १०० विद्यार्थ्यांची ( जेईई’ व ‘नीट’ साठी) उपक्रमाच्या निकषाच्या आधारे निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना निशुल्क, निवासी स्वरूपाचे NEET व JEE Advance चे प्रशिक्षण उपलब्ध करुन देण्यात येणार आहे .निवड परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ऑनलाइन गुगल फॉर्मद्वारे रजिस्ट्रेशन/नोंदणी करावी लागेल. दिनांक ८ जून २०२५ रोजी होणाऱ्या निवड चाचणी परीक्षेसाठी ‘जेईई’ व नीट या दोनही अभ्यासक्रमासाठी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी ,गणित व इंग्रजी यात मिळालेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करण्यात येणार असून उच्चातम गुणप्राप्त ३०० विद्यार्थ्यांची दुसऱ्या राऊंड मधे पुन्हा जिल्हा परिषद नाशिक येथे चाचणी परीक्षा होईल.त्यामधून मिळालेल्या गुणांच्या आधारे अंतिम निवड यादी तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना आपले बैठक क्रमांक हे जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार असून प्रत्येक तालुकास्तरावर परीक्षा केंद्र असणार आहे. या उपक्रमाच्या नियम निकषान्वये जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील शासकीय, अनुदानित, अंशतः अनुदानित विद्यालयातून मार्च २०२५ मध्ये इ.१०वी उत्तीर्ण झालेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.यात काही अडचण असलेल तालुक्यातील पंचायत समिती मधील शिक्षण विभाग गटशिक्षणाधिकारी यांचे कडेस जावुन गुगल लिंक वर अर्ज भरता येईल. *जिल्हा परीषद नाशिक चे संकेतस्थळावर जावुन किंवा खालिल QRCODE वरून किंवा खालिल गुगल लिंक वर विद्यार्थी अर्ज भरू शकतात.👇🏻*https://tinyurl.com/Super50Form
