
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१७ वा दिवस स्वतःचा व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करणे ही तुमची प्राथमिकता असली पाहिजे. तुमचे जीवन सुंदर, समृद्ध, सफल व सार्थक व्हावे. मानवतावादी विचारांसाठी तुम्ही सतत प्रयत्न करावा ही तुमची अतःप्रेरणा असावी. आज या घटकेपासून तुम्ही निर्धार करा, स्वतःला कमकुवत विचारांपासून सतत दूर ठेवाल आणि मनात समृध्द व सकारात्मक विचार सतत तेवत ठेवाल. यामुळे तुम्हाला सुख, शांती, समृद्धि मिळेल, पर्यायाने, तुमची इच्छित फलप्राप्ती होईल. कितीतरी लोक धनाने श्रीमंत असतात; पण विचाराने दरिद्री असतात. चांगल्या विचारांना तेवढ्याच ताकदीने कृतीत आणायला हवे.
*स्वामी विवेकानंद…*
●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर ५ जेष्ठ शके १९४७
★ वैशाख वद्य /कृष्ण १४
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. २६ मे २०२५ ★ सोमवती अमावस्या
★ शनैश्चर जयंती
★ १८८५ सुप्रसिध्द मराठी नाटककार, विनोदकार, कवी राम गणेश गडकरी यांचा जन्मदिन.
★ १९४५ माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचा जन्मदिन.
