
नाशिक 🙁 प्रतिनिधी )वंचित बहुजन आघाडी नाशिक महानगर तसेच जिल्हा कमिटीकडून महत्त्वपूर्ण बैठक दिनांक २१ मे रोजी पार पडली. आगामी महानगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने घेण्यात आलेल्या बैठकीत नुकतीच नाशिक समन्वयक म्हणून निवड झालेल्या दिशा पिंकी शेख यांचा अभिनंदनाचा ठराव पारित झाला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत सन्मानाने युती झाल्यास युती किंवा स्वबळावर निवडणुका लढविण्याचा निर्धार तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखविला. यावेळी महानगर प्रमुख अविनाश शिंदे यांनी महानगरातील पदाधिकाऱ्यांकडून अहवाल संकलित केला. बैठकीच्या शेवटी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी काल. जितुभाऊ साळवे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.या बैठकीला वंचित बहुजन युवा आघाडीचे प्रदेश सदस्य चेतन गांगुर्डे, उत्तर महाराष्ट्र महासचिव वामनदादा गायकवाड, महिला जिल्हा अध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, महानगर अध्यक्ष अविनाश शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष दामोदर पगारे, नेते संजय साबळे, जिल्हा कोषाध्यक्ष विश्वनाथ चावदास भालेराव, मिहीर गजभे,मारुती घोडेराव,सन्नीजी जाधव, अमोल घोडे, महेश भोसले,अमीनभाई शेख,नदीम शेख, विशाल भवर, युवा महानगर महासचिव दिपक पगारे, संदीप काकळीज, विक्रम जगताप, रमेश गवळी,बाळासाहेब जाधव, दीपक भंडारी, राहुल पाटेकर, बाळासाहेब शिंदे, दादामामा शिरसाठ, सचिन चोपडे, निलेश कटारे, नंदुभाऊ पगारे, नितुताई सोनकांबळे, मिलिंद सावंत, विलास गुंजाळ,अमोल चंद्रमोरे, मधुकर कर्डक, सुरेश काशिद, यशवंत शिंदे, संजय सोनवणे, विशाल पडमुख,साहेबराव शिंदे, पंडित नेटावणे, ताराचंद मोतमल, विनय कटारे , दिलीप लिंगायत, भीमराव गांगुर्डे, संतोष वाघ, आदी कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
