लेखक:- श्री ज्ञानेश्वर खैरनार प्रसिद्धीप्रमुख सगर साहित्य वडेलकर. ता. मालेगांव जि. नाशिक

गावकुसाच्या साहित्यातले नंदन तात्या आणि जीवन गौरव ताहाराबाद सारख्या सदन गावातील मध्यमवर्गिय सर्व साधारण कुटुंबातील साहेबराव नंदन उर्फ तात्या जेमतेम १० वी पर्यंत शिकले कुटुंबाला आधार म्हणून मिळेल ते काम करत होते पुर्वीच्या काळी गावगाड्याची करमणूक म्हणून अधुनमधून गंमती [ तमाशा ] नाटीका आयोजित केल्या जात असे गावातील हौशी कलाकार एकत्र येऊन हौशी नाटकं बसवायचे.त्या नाटकांचे गावोगावी गणेशोत्सवात सादरीकरण करायचे.त्या हौशी कलाकारांन पैकी एक अवलिया कलाकार साहेबराव तात्या !ऐशीच्या दशकात खेड्यातील गावकुसाच्या बाराबलुतेदार समाजातील कलावंत शोधून, तात्या स्वतःच कथा पटकथा संवाद गीतरचना व कलावंत म्हणून स्वनिर्मित नाटकात भूमिका करत. त्यांच्या नाटकातून लोकरंजनातून लोक शिक्षण, मनोरंजनातून समाज प्रबोधन हमखास व्हायचेच. काळाच्या पडद्याआड गेलेली त्यांची नाटके आजही चर्चेचा विषय आहे. दारूने झिंगला संसार भंगला , शनिचा फेरा , मेहंदी रंगली रक्ताची, कुंकवाचा करंडा, इ. इ. तात्या वैवाहिक जिवना आधी त्यांनी पोटप्रपंचासाठी अनेकविध उद्योग केले. कधी पानशॉप कधी वाचनालय , बुक स्टॉल न्यूजपेपर एजंट , किराणा, बाजारहाट सर्वच करून पाहिले परंतू त्या काळी वर्तमान आयुष्यात यशाचे दाण पदरात कधी पडलेच नाही.शेवटी रोजीरोटीच्या शोधात नाशिक ला आले अन् नाशिककर झाले. मिळेल ते काम केले , छोटा मोठा व्यवसाय ही केला.काही तरी वेगळं करायची धमक शांत बसू देत नव्हती.म्हणून थोडा काळ नाशिकमध्ये मोठ्या राजकीय पक्षात सहभागी झाले….भा.ज.प सारख्या पक्षात स्थानिक कार्यालयात काम पाहीले पण तेथे मन रमले नाही.कारण तो पिंडच तात्यांचे नव्हता.धार्मिकवृती अंगी असल्याने प्रवचन ही केले. अँकरीग केले, आजही प्रवचन, कथाकथन करण्यात त्यांचा हातखंड आहे. या जिवन प्रवासात कोरोनाचा काळ साहेबराव तात्यांसाठी आयुष्याला कलटणी देणारा ठरला.तेव्हा सर्वत्र संचारबंदी होती.गाव खेड्या पासून ते शहरा पर्यंत सर्वच नागरी वस्त्या ओस पडल्या होत्या एकदम ठ्ठप !हाताला काम नाही, बाहेर पडायला वाव नाही. रिकाम्या वेळेचा सदुपयोग म्हणून तात्या आणि त्यांचे मित्र ललितभाऊ साळवे यांनी सगर समाजातील सामाजिक कार्यकर्ते , ज्ञानवंत, गुणवंत कतृत्ववान उच्चशिक्षित नव्हे नव्हे समाजभान ठेवत गावकुसाच्या गावगाड्यातले पुढारी काय राजकीय, सामाजिक, डॉक्टर वकील, शिक्षक इंजिनिअर,सनदी अधिकारी काय इ.विशेष प्रावीण्य मिळवलेल्या समाजबांधवांनची “जिवन गाथा” सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉटस् ऍपवर आपल्या लेखणीतून समाजापुढे “” सगर रत्न “” या लेखण मालिकेतून मांडले.त्यावेळी हे लेखण खुप लोकप्रिय झाले होते. समाज उत्सुकतेने पुढील सगर रत्न कोण असतील ? म्हणून वाट पाहत असत. येथेच तात्यासाहेबांन मधला लेखकाचा उदय झाला तो वयाच्या अठठावन्नव्या वर्षी !परत मागे वळून पाहिले नाहीच. एका मागे एक सरस कथा लघुकथा,अलक लिहिले ते समाजाच्या ग्रुपवर , साहित्य समुह, गावखेड्याच्या काळ्यामातीतील काटेकुट्यातील कधी अठराविश्व दारिद्र्य तर कधी सदन कुटुंबातील बायजाकाकू व तुकातात्या डोळ्यात पाणी येईपर्यंत रंगवले.पुढे पुस्तकं लिहिले प्रकाशित केले.त्यातील काही गाजलेले पुरस्कार प्राप्त साहित्य परिसस्पर्श चरित्र कादंबरी , गावगाडा काव्यसंग्रह, सगररत्न विशेषांक , सगरसेवार्थी अंक स्नेहबंध विशेषांक , सगर दीपोत्सव दिवाळी अंक. कथा,लघुकथा,अहिराणी साहित्य प्रसिद्ध आहे….अशा ह्या गरीब परिस्थितीच्या पण उच्च विचारांच्या लेखकाला अनेक पुरस्काराने अनेक संस्थांनी सन्मानित केले आहे आहे.एवढेच काय विविध साहित्य समुह ग्रुपचे शेकडो सत्मानपत्रे अनेक संस्थाचे मानाचे पुरस्कार त्यांच्या नावे आहेत. आता वयाच्या बासष्टीत तीसरा जीवन गौरव पुरस्कार प्राप्त होत आहे. या आधी तात्यांना जळगाव,मुंबई नंतर आता नाशिकमध्ये. तोही छत्रपती संभाजी नगर येथील काळीज माझे साहित्य समुहाचा मानाचा तीसरा जीवन गौरव पुरस्कार आपल्या कर्मभूमीत, गोदातटी नाशिक नगरीत. खान्देशचे भूषण ताहाराबादचे आभूषण साहित्यातले शांत संयमी धीरगंभीर उदात्त विचारांच्या तात्यासाहेबांना आपल्या कर्मभूमीतील “जीवनगौरव” पाहून , तुकातात्या व बायजाकाकू [ काल्पनिक कथेतील ] स्वर्गातून आनंदाश्रूनी सन्मानित करतील यात शंकाच नाही.फक्त हे कौतुक पाहण्यासाठी, त्यांचे वडील स्वर्गीय आनंदराव आण्णा, आई विमलाई, बंधुतुल्य पाठीराखे कै. संभाजीराव पगारे उर्फ बापूसाहेब हवे होते.त्याची उणीव न भरणारी आहे. पुनश्च अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा.
