
सिन्नर ( प्रतिनिधी)२२ मे थोर समाजसुधारक राजा राममोहन राय यांची २५३ वी जयंतीनिमित्त महामित्र परिवार,व आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड यांच्या वतीने साजरी करण्यात आली**या कार्यक्रमाची सुरुवात राजा राममोहन राय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आली* कार्यक्रमाचे अध्यक्ष महामित्र दत्ता वायचळेम्हणाले समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बालविवाह सती प्रथा यांसारख्या समाजविघातक प्रथांविरूध्द लढा उभारणारे थोर समाजसुधारक राजा राममोहन रॉय यांनी सामाजिक दुष्कृत्यांशी लढण्यासाठी आणि भारतातील सामाजिक आणि शैक्षणिक सुधारणांचा प्रसार करण्यासाठी आत्मीय सभा आणि युनिटेरियन समुदायाची स्थापना केली. ते अंधश्रद्धेविरुद्ध लढणारे, भारतीय शिक्षणाचे प्रणेते आणि बंगाली गद्य आणि भारतीय वृत्तपत्रात एक ट्रेंड सेटर होते. राजा राममोहन रॉय यांना भारतात नवविचाराचे जनक म्हंटले जाते.

त्यांनी सतीप्रथा, बालविवाह यांसारख्या समाजातील कुप्रथांविरुद्ध त्यांनी उघडपणे लढा दिला. त्यांनी गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांच्या मदतीने त्यांनी सती प्रथेविरुद्ध कायदा केला. त्यांनी फिरून लोकांना सतीप्रथेविरूध्द जागृत केले. लोकांच्या विचारात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी अथक परिश्रम घेतले. त्यांनी महिलांचे पुनर्विवाह, मालमत्तेतील अधिकार यासह महिलांच्या हक्कांसाठी प्रचार केला. सती आणि बहुपत्नी प्रथेला त्यांनी कडाडून विरोध केला. त्या काळात बरेच मागासलेपण होते. राजा राम मोहन रॉय यांच्यावर युरोपातील पुरोगामी आणि आधुनिक विचारांचा प्रभाव होता.अशा महान थोर समाजसुधारक राजा राममोहन राय यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विजय मुठे,प्रास्थाविक रामु इदे तर आभार रूपेश मुठे यांनी मानले.यावेळी महामित्र दत्ता वायचळे, माजी नगरसेवक रुपेश मुठे, आद्यक्रांतिकारक राघोजी ब्रिगेड चे संस्थापक रामु इदे, सहसंस्थापक विजय मुठे, बाळासाहेब मुठे, मनोहर सोनवणे, बाळकृष्ण पारे, योगेश मोरे, शरद जाधव, ज्ञानेश्वर शिंदे, नामदेव खर्जे, समर्थ तालखे, संचिता गांगुर्डे, अनिकेत गांगुर्डे, कोमल चांदणे आदि.उपस्थित होते.
