
साहित्यिक श्री. नंदकिशोर ठोंबरे

कवी सोमनाथ पगार
नाशिक ( प्रतिनिधी )नाशिकच्या दोन साहित्यिकांना “काव्य गौरव” पुरस्कार जाहीर नाशिकच्या साहित्य क्षेत्रातील दोन साहित्यिकांना त्यांच्या कवितासंग्रहासाठी ‘राज्यस्तरीय काव्य गौरव पुरस्कार’ जाहीर झाले आहेत. पुण्यातील सुप्रसिद्ध कवी चंद्रकांत जोगदंड यांच्या वतीने आयोजित वैशाखी वादळवारा काव्य महोत्सव व पुरस्कार समारंभात रविवार, दिनांक ८ जून २०२५ रोजी एस. एम. जोशी फाउंडेशन, पत्रकार भवन शेजारी, गांजवे चौक, पुणे येथे मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारचे वितरण होणार असल्याचे कवी चंद्रकांत जोगदंड यांनी कळवले आहे.नाशिकचे साहित्यिक श्री. नंदकिशोर ठोंबरे यांच्या ‘मी मला शोधताना’ तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या नवलेखक अनुदान योजनेत प्रकाशनार्थ अनुदान प्राप्त होऊन ठाणे येथील अनघा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या कवी सोमनाथ पगार यांच्या ‘वेदनेचे काटे’ या दोन्ही साहित्यिकांच्या कवितासंग्रहास कवी चंद्रकांत जोगदंड आयोजित विश्वरत्न इंग्लिश मीडियम स्कुल, विष्णुपंत ताम्हणे विद्यालय, चिखली, पुणे यांचे तर्फे दिला जाणारा ‘काव्य गौरव पुरस्कार’ अशा या मानाच्या राज्यस्तरीय तसेच साहित्य क्षेत्रातील मोठ्या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.त्यासाठी मान्यवर परीक्षक तसेच आयोजक संस्थांचे मनःपूर्वक आभार मानत या पुरस्कारामुळे मिळणारी पाठीवरील कौतुकाची थाप आमच्या साहित्यिक कारकीर्दीसाठी मैलाचा दगड आहे. हे नक्की. असे मत दोन्ही साहित्यिकांनी प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.नाशिकच्या साहित्य क्षेत्रातून या दोघांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
