
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९१३ वा दिवस* नवा मार्ग शोधून काढणे ही खरोखरीच फार मोठी कामगिरी होईल यात शंका नाही. परंतु तो मार्ग स्वच्छ करणे, सुंदर करणे व प्रशस्त करणे हे तितकीच कठीण काम आहे. ज्यांना आधिच तयार असलेल्या गोष्टींचीही व्यवस्था योग्य पद्धतीने पाहता येत नाही. ती व्यवस्था योग्य पध्दतीने सांभाळता येत नाही. अशी माणसे नव्या गोष्टी कशा काय हाताळणार? नव्या मार्गावर कशाप्रकारे यशस्वीपणे मार्गस्थ होणार? लोकांपुढे काय आदर्श ठेवणार? भारतीय लोकं आरंभशूर आहेत. नवनवीन गोष्टी, नवनवीन व्यवस्था तयार करण्यात त्यांना अधिक रस आहे. पण यातून भूतकाळातील पाऊलखुणा, आदर्श, मार्ग जगापुढे काय ठेवणार.
स्वामी विवेकानंद…
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●
★ भारतीय सौर १ जेष्ठ शके १९४७*
★ वैशाख वद्य /कृष्ण १०
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ गुरुवार दि. २२ मे २०२५ ★ १७७२ सतीबंदीचा कायदा पारीत करुन घेणारे, आधुनिक भारताचे जनक, थोर समाजसुधारक राजाराम मोहनराय यांचा जन्मदिन.
★ १९९१ भारतीय कामगार संघटनेचे नेते, साम्यवादी पक्षाचे जेष्ठ नेते श्रीपाद अमृत डांगे यांचा स्मृतीदिन..
★ जागतिक जैवविविधता दिन.

