
चांदवड (प्रतिनिधी )तळेगाव रोही येथील अर्जुन पुरस्कार विजेत्याकडून मंत्री छगन भुजबळ यांचा सत्कारनाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील तळेगाव रोही गावचे सुपुत्र, ऑलिंपिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आणि अर्जुन पुरस्कार विजेते श्री दत्तूभाऊ भोकनळ यांची नुकतीच क्रीडा वर्ग एक अधिकारी म्हणून निवड झाली. या निमित्ताने त्यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. मंत्रीपद मिळाल्याबद्दल शुभेच्छा देत सामाजिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाबद्दल चर्चाही झाली.—
