
मंचर (प्रतिनिधी)अभय योजना शासन निर्णयानुसार मंचर शहरांमध्ये नगरपंचायत च्या माध्यमातून शास्ती कर 50% पर्यंत माफ करण्यात यावा या संदर्भात भारतीय जनता पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.आज दि.21 रोजी,जिल्हाधिकारी कार्यालय पुणे या ठिकाणी भाजपा नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेगाव तालुका मध्य तालुकाध्यक्ष स्नेहलताई चासकर यांनी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम मॅडम यांची भेट घेऊन निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की,महाराष्ट्र शासन नगर विकास विभाग शासन निर्णयाप्रमाणे नगरपंचायत क्षेत्रातील थकीत मालमत्ता करा वरील शासकीय 50% माफ करण्याबाबत अभय योजना काल दि.19 रोजी चालू करण्यात आली आहे.त्यानुसार आपणही मंचर शहरांमध्ये नगरपंचायत च्या माध्यमातून शासकीय कर 50 % पर्यंत माफ करावा व मंचरकरांना दिलासा मिळवून द्यावा असे सांगितले.तसेच काल दिनांक २० रोजी मंचर नगरपंचायत ला भाजप नेते जनसेवक श्री संजय भाऊ थोरात यांनी मुख्य अधिकारी यांना अभय योजनेअंतर्गत आपण तात्काळ तसा प्रस्ताव जिल्हाधिकारी साहेब यांच्याकडे सादर करावा जेणेकरून राज्य शासनाने जाहीर केलेल्या अभय योजनेचा लाभ सर्वसामान्य मंचरकरांना घेता येईल या यासंदर्भात निवेदन दिले होते.त्या अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी उपजिल्हाधिकारी मॅडम यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले.यावेळी भाजपा मध्य मंडल तालुकाध्यक्ष स्नेहलताई चासकर व सुषमाताई थोरात उपस्थित होत्या.
