
सिन्नर (प्रतिनिधी) खगोल शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांचे आज निधन झाले. त्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती सिन्नर तर्फे श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी बोलताना महाराष्ट्र अंनिसचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. श्यामसुंदर झळके यांनी सांगितले की, डॉ. जयंत नारळीकर यांनी आपले संपूर्ण जीवन समाजातील अंधश्रद्धा, अनिष्ट प्रथा,परंपरा मोडीत काढण्यासाठी, ग्रहतारे विषयीचे गैरसमज तरच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी समर्पित केले. तालुका अध्यक्ष हरिभाऊ तांबे यांनी डॉ. जयंत नारळीकर यांच्या जाण्याने अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीची हानी झाली. त्यांनी वैद्न्यानिक जाणीवा निर्माण करण्यासाठी अनेक पुस्तके लिहिली. यावेळी अनिसचे कार्याध्यक्ष सुकदेव वाघ, प्रधान सचिव राजेंद्र मीठे ,राहुल पगारे, बस्तीराम कुंदे महामित्र दत्ता वायचळे,प्रमोद काकडे,बापू चतुर आदी उपस्थित होते.
