
नांदगाव (प्रतिनिधी )दि.19 मे 2025 रोजी नांदगाव येथे विश्व हिंदू परिषद व गौ रक्षक नांदगाव यांच्या वतीने गौवंशांच्या सुरक्षेच्या अनुषंगाने विविध शासकीय विभागांना निवेदन देण्यात आले.*या निवेदनाच्या माध्यमातून नांदगाव नगरपालिका, नांदगाव पोलीस स्टेशन, सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नांदगाव तहसील कार्यालय यांच्याकडे गौवंशाच्या रक्षणासाठी तातडीने कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. व त्यावरील उपाय योजना करावा ही वीनंती .गौहत्या प्रतिबंधक कायद्याची प्रभावी अंमलबजावणी, भटक्या जनावरांसाठी योग्य निवारा उपलब्ध करणे, तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात कडक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
