
मनमाड (प्रतिनिधी): शहरातील हनुमान नगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, हुडको परिसरासह अनेक भागांत गेल्या काही दिवसांपासून चार तासांहून अधिक काळ वीजपुरवठा खंडित होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. याविरोधात मानवाधिकारक्षक मंच चे राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे यांच्या नेतृत्वाखाली वीज वितरण कंपनी व MSEDCL ला जाब विचारण्यात आला.विशेष म्हणजे, तक्रारी नोंदविण्यासाठीचा 02591 222384 हा कस्टमर केअर क्रमांक देखील बंद असल्याने नागरिक अधिक त्रस्त झाले. “टेलिफोन एक्सचेंजमध्ये समस्या आहे,” असे उत्तर देत विभागीय सहाय्यक अभियंत्यांनी जबाबदारी झटकली, हे विभागीय सहाय्यक अभियंत्यांचे बे जबाबदार पणा आहे असा आरोप करण्यात येत आहे.या वेळी मंचचे अध्यक्ष उल्हास डफळे यांनी म्हटले की, “विजेचा दीर्घकाळ खंडीत पुरवठा हा ग्राहकांच्या हक्कांचा भंग आहे. नियमानुसार, पुरवठा सातत्याने खंडित केल्यास वीज वितरण कंपनीने ग्राहकांना भरपाई देणे बंधनकारक आहे.”या वेळी मानवाधिकर रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे सोबत मानवाधिकार रक्षक मंच लीगल एडवाइजर आबिद शेख, नवीद अंसारी,जोशुआ डफळे, अमोल. नरवडे, अनिरुद्ध तोंडे, अकिब पठाण, लकी मोरे, सुरेश आहिरे, राजाभाऊ शुक्ला, सोनू उबाळे.स्वप्नील शिरसाठ, स्वप्नील बोदडे, प्रमोद हिंगमिरे, रोहित थोरात. असे मनमाड शहरातील अनेक नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होता. नागरिकांनी वीज वितरण व्यवस्थेतील हलगर्जीपणावर संताप व्यक्त करत, त्वरित सुधारणा न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. मानव अधिकार रक्षक मंच राष्ट्रीय अध्यक्ष उल्हास डफळे व पदाधिकारी यांनी दिला आहे….
