
येवला प्रतिनिधी ( दिपक उंडे)सामाजिक न्याय विभागाच्या अनु. जाती व नवबौद्ध मुलांची शासकिय निवासी शाळा बाभुळगावं ता .येवला जि. नाशिक येथील शाळेत वर्ष 2025 ते 26 करता इयता 6 वी ते 10 वी सेमी इंग्लिश वर्गाकरिता मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्याचे आव्हान मुख्याध्यापक श्री राहुल वरकड यांनी केले आहे. तसेच. इयत्ता 6 वी ते 10 वी वर्गातील ठरलेल्या प्रवर्ग निहाय रिक्त जागांवरच प्रवेश होतील याची पालकांनी नोंद घ्यावी. व प्रवेशकरीता विद्यार्थ्यांचे आरक्षण टक्केवारी अनुसूचित जाती 80%, अनुसूचित जमाती 10%, विभाजन 5 टक्के, एसबीसी आणि दिव्यांग करिता 5 टक्के विद्यार्थ्यांकरता आरक्षण असून भव्य सुसज्ज इमारत , निसर्गरम्य परिसर, तंत्र शिक्षक वृंद, सुसज्ज ग्रंथालय, प्रशस्ती खेळ आणि खेळाचे साहित्य, मोफत शैक्षणिक साहित्य आणि गणवेश , विद्यार्थ्यांकरिता नाष्टा व भोजन व्यवस्था, संगणक प्रयोगशाळा, अद्यावत डिजिटल रूम द्वारे उत्कृष्ट अध्ययन ची व्यवस्था असून प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. अधिक माहितीसाठी प्रवेश करीता मुख्याध्यापक श्री राहुल वरकड मो. 9028526925 यांच्याशी संपर्क साधावा.
