
सातत्यपूर्ण संकल्पाचा अखंडित २९११ वा दिवस* धैर्याने, शौर्याने, सतत पुढे पुढे चला. एका दिवसात एका वर्षात यश आपल्या पदरी पडेल अशी अपेक्षा मुळीच बाळगू नका. आपल्याला पुरुषांच्या बरोबरीने स्त्रियांची देखील आवश्यकता आहे. आत्म्याच्या बाबतीत कोणताच लिंगभेद नसतो. भारताच्या हिमालय पर्वतापासून ते कन्याकुमारी पर्यंत. उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत सर्वत्र वणव्याप्रमाणे पसरणारे सहस्त्र नरनारी आपल्याला हवे आहेत. नुसता पोरखेळ करीत बसण्यात काहीच अर्थ नाही. त्यासाठी आपल्याला सवडी नाही. केवळ पोरखेळ करण्यासाठी जमलेल्यांनी सरळ चालते व्हावे. अद्यापि वेळ गेली नाही. त्यांचे इथे काहीही काम नाही.
*स्वामी विवेकानंद…*
*●आपला दिवस आनंदमय, मंगलमय होवो●**
★ भारतीय सौर २९ वैशाख शके १९४७*
★ वैशाख वद्य /कृष्ण ७
★ शालिवाहन शके १९४७
★ शिवशक ३५१
★ विक्रम सम्वत् २०८२
★ युधिष्ठिर शके युगाब्द ५१२७
★ सोमवार दि. १९ मे २०२५
★ १९०४ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे सुप्रसिध्द उद्योजक, देशभक्त जमशेदजी नसरवानजी टाटा यांचा स्मृतीदिन.
★ १९५८ बंगाल मधील सुप्रसिध्द भारतीय इतिहासकार सर जदूनाथ सरकार यांचा स्मृतीदिन.
★ २००८ मराठी लेखक, साहित्यिक, परखड वक्तव्यासाठी प्रसिद्ध विजय तेंडुलकर यांचा स्मृतीदिन.
